Chopda Accident : ट्रकची दुचाकीला धडक; वृद्धेचा जागीच मृत्यू, दोन जण जखमी

Jalgaon News : अडावद गावाकडून चोपडा येथे जाण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत आजी गजाबाई बारेला आणि आजोबा सोनारसिंग पिदा बारेला हे देखील होते. दुचाकीने तिघेजण चोपडा येथे जात होते
Chopda Accident
Chopda AccidentSaam tv
Published On

जळगाव : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले वृद्ध व तरुण गंभीर जखमी आहेत. सदर अपघात अंकलेश्वर महामार्गावरील चोपडा तालुक्यातील अडावद येथील पेट्रोल पंप परिसरात घडली आहे.

Chopda Accident
Doctors On Strike : घाटी रुग्णालयाचे डॉक्टर संपावर; निवासी डॉक्टरला मारहाण झाल्यानं संघटना संतापली!

यावल तालुक्यातील उसमळी पाडा येथील गजाबाई सोनारिंग बारेला असे अपघातात मृत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. उमाळी येथे वास्तव्यास असलेला सुभाष चोटीराम बारेला (वय २०) हा तरूण १५ जूनला अडावद गावाकडून चोपडा (Chopda) येथे जाण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत आजी गजाबाई बारेला आणि आजोबा सोनारसिंग पिदा बारेला हे देखील होते. दुचाकीने तिघेजण चोपडा येथे जात होते. 

Chopda Accident
Crop Insurance : चिकू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; नुकसान भरपाईसाठी मिळणार विमा कवच

दुचाकी हळू करताच मागून धडक 

दरम्यान अडावद गावाजवळील पंपाजवळ पेट्रोल भरण्यासाठी सुभाष बारेला याने दुचाकी हळू केली. यावेळी पेट्रोल पंपावर वळण घेण्याच्या तयारीत असतांना त्याला ट्रकने जोरदार (Accident) धडक दिली. या धडकेत गजाबाई बारेला या वृध्द महिला फेकल्या जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुभाष बारेला आणि त्याचे आजोबा सोनारसिंग बारेला हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com