Crop Insurance : चिकू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; नुकसान भरपाईसाठी मिळणार विमा कवच

Palghar News : चिकूचे उत्पादन घेताना अनेकदा जास्त पाऊस, अधिक उन्हाची तिव्रता यामुळे चिकूचे नुकसान होत होते. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन देखील याची भरपाई मिळत नव्हती
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

पालघर : चिकू हा नाशवंत फळ असल्याने चिकू उत्पादक शेतकऱ्यांना अतिपाऊस आणि अति ऊन, हवामानातील आर्द्रता याचा मोठा फटका बसत असतो. मात्र चिकू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला असून हवामान बदलामुळे चिकूचे नुकसान झाल्यास त्याला विमा कवच देण्यात आले आहे. 

Crop Insurance
Ratnagiri Yellow Alert : रत्नागिरी जिल्ह्याला १९ जूनपर्यंत येलो अलर्ट; चिपळूण तालुक्यात जोरदार पाऊस

चिकूचे उत्पादन घेताना अनेकदा जास्त पाऊस, अधिक उन्हाची तिव्रता यामुळे चिकूचे नुकसान होत होते. यात (Farmer) शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन देखील याची भरपाई मिळत नव्हती. यामुळे चिकू उत्पादक शेतकऱ्यांना विमा कवच देण्यात यावे, तसेच चिकू विम्याची हेक्टरी हप्ता पूर्ववत करून ३५०० करावी; अशी मागणी आमदार मनीषा चौधरी यांनी केली होती. यावर कृषीमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

Crop Insurance
Doctors On Strike : घाटी रुग्णालयाचे डॉक्टर संपावर; निवासी डॉक्टरला मारहाण झाल्यानं संघटना संतापली!

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा 

चिकू पिकाला विमा (Crop Insurance) कवच मिळावे याबाबत आमदार मनीषा चौधरी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत केले होती. यावर सरकारने तातडीने उपाययोजना करत ही मागणी मान्य केली आहे. सरकारने या घेतलेल्या निर्णयामुळे हजारो चिकू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com