Kasba Peth Cylinder Blast: कसबा पेठमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

Dharashiv's Kasba Peth News: धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील कसबा पेठ भागात वास्तव्यास असलेले बंडू कदम यांच्या घरी ही दुर्घटना घडली.
Kasba Peth Cylinder Blast: कसबा पेठमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
Gas Cylinder BlastSaam TV

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील कसबा पेठ येथे गॅस सिलेंडरमधूल गॅस लीक होऊन भडका उडाला. यात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत घरासह संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

Kasba Peth Cylinder Blast: कसबा पेठमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
Crop Insurance : चिकू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; नुकसान भरपाईसाठी मिळणार विमा कवच

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील कसबा पेठ भागात वास्तव्यास असलेले बंडू कदम यांच्या घरी ही दुर्घटना घडली, सजकी स्वयंपाक झाल्यानंतर घरातील महिलेने गॅस बंद केला. यानंतर घरातील सर्व सदस्य कामानिमित्ताने बाहेर गेले होते. मात्र गॅस (Gas) बंद करताना गॅस लीक होत राहिला, यामुळे बंद घरात गॅसने भडका उडाल्याने सिलेंडरचा स्फोट झाला. यात घराचे मोठे नुकसान झाले आहे. 

Kasba Peth Cylinder Blast: कसबा पेठमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
Chopda Accident : ट्रकची दुचाकीला धडक; वृद्धेचा जागीच मृत्यू, दोन जण जखमी

सुदैवाने जीवितहानी नाही 

गॅस सिलेंडरच्या (Cylinder Blast) स्फोटमध्ये घरातील साहित्याचे मोठं नुकसान झालं आहे. शिवाय मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घाबरत पसरली होती. मात्र घटना घडली त्यावेळी कुटुंबातील कोणताही सदस्य घरात नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. दरम्यान घटनेचा पंचनामा करून तात्काळ मदतीची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com