Ahmednagar Politics Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil: Saamtv
महाराष्ट्र

Nilesh Lanke News: 'पॉवर ऑफ कॉमन मॅन', पारनेरमध्ये झळकले इंग्रजी बॅनर; निलेश लंके समर्थकांनी विखेंना डिवचलं!

Ahmednagar Politics Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil: लोकसभा निवडणुकीत विखे पाटलांच्या साम्राज्याला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी दिल्लीचे तिकीट मिळवले. या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी इंग्रजी भाषेवरुन निलेश लंकेंना डिवचले होते.

Gangappa Pujari

सुशिल थोरात अहमदनगर, ता. २९ जून २०२४

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये इंग्रजी बोलण्यावरुन चांगलीच जुगलबंदी रंगली होती. निवडणुकीत विजय मिळवून संसदेत गेलेले खासदार निलेश लंके यांनीही इंग्रजीमधून शपथ घेत विखेंना चोख प्रत्यूत्तर दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पारनेरमध्ये निलेश लंकेंच्या समर्थकांनी चक्क इंग्रजीमधून बॅनरबाजी करत विखे पाटलांना टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीत विखे पाटलांच्या साम्राज्याला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी दिल्लीचे तिकीट मिळवले. या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी इंग्रजी भाषेवरुन निलेश लंकेंना डिवचले होते. आता पारनेरमध्ये लंकेंच्या समर्थकांनीही बॅनर लावून विखेंना प्रत्यूत्तर दिले आहे.

खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी पारनेर येथे चक्क इंग्रजी बॅनर झळकावले आहेत. "डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन' असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला आहे. लंके समर्थकांनी झळकावलेल्या या बॅनर्सची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, "लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना भाषेवरुन ट्रोल करण्यात आले. मात्र त्यांचे कुटुंब उच्च शिक्षित आहे. मात्र सर्वसामान्य, गोरगरिब जनतेला समजेल अशी भाषा ते वापरतात, असे म्हणत अर्जुन भालेकर यांनी इंग्रजीवरुन ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT