Nilesh Lanke Oath : निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ; सुजय विखेंना विखारी टोला, पाहा VIDEO

Nilesh Lanke Parliament Oath : अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधीचा व्हिडीओ समोर आला आहे.
निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ; सुजय विखेंना विखारी टोला, पाहा VIDEO
Nilesh Lanke Parliament OathSaam TV

संसदेत आज नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होत आहेत. महाराष्ट्रातून देखील महाविकास आघाडीचे खासदार शपथविधीच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत गेले आहेत. अशातच अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

निलेश लंके (Nilesh Lanke) हे राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा पराभव केला होता. निवडणुकीच्या प्रचारात निलेश लंके यांच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी हिणवलं होतं.

सुजय विखे पाटील यांनी तर थेट निलेश लंके इंग्रजीतून कसे बोलणार? त्यांना इंग्रजी येते का? असं म्हणत खिल्ली उडवली होती. मात्र, निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव करत राजधानी दिल्ली गाठली. संसदेत (Parliament House) प्रवेश करण्याआधी त्यांनी पायऱ्यांवर डोकंही टेकवलं.

निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ; सुजय विखेंना विखारी टोला, पाहा VIDEO
Maharashtra Politics : विधासभेसाठी शरद पवारांचा मास्टर प्लान; मुंबईत 'इतक्या' जागा लढवणार, महाराष्ट्र पिंजून काढणार

त्यानंतर सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना निलेश लंके यांचे नाव पुकारले गेले. महाविकास आघाडीचे काही खासदार मराठीतून शपथ घेत असताना निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून शपथ घ्यायला सुरुवात केली.

लंके यांना खडाखड इंग्रजी बोलताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सत्ताधारी पक्षाच्या काही खासदारांनी तर तोंडातच बोटं घातली. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंके यांनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत सर्वांसमोर हात जोडले. लंके यांच्या शपथविधीचा व्हिडीओ पाहून त्यांचे कार्यकर्ते भारावून गेले होते.

निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ; सुजय विखेंना विखारी टोला, पाहा VIDEO
Sanjay Raut On Kangana Ranaut: मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी करणं हा मूर्खपणा; संजय राऊत कंगना रनौतवर संतापले; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com