bacchu kadu, ravi rana, eknath shinde, amravati saam tv
महाराष्ट्र

Politics : भाजप आमदारावर अखदलपात्र गुन्हा दाखल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फाेन, वाद मिटणार ?

दाेन्ही नेत्यांमधील वाद गेला आहे विकाेपाला.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Amravati News : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद मिटवण्यासाठी खूद्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पुढाकार घ्यावा लागला आहे. या दाेन्ही नेत्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी फाेन केल्याची चर्चा आहे. लवकरच चाैघांमध्ये बैठक हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bacchu Kadu vs Ravi Rana Latest News)

शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर रविवारी बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी राणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पाेहचली आहे. यानंतर दाेन्ही नेत्यांनी आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्याना फाेन केल्याचे समजते. दिवाळीनंतर दाेन्ही नेते बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यासमवेत एक बैठक घेऊन वादावर पडदा टाकणार असल्याचे समजते. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT