CM शिंदेंचं टेन्शन वाढवणारी बातमी; गुवाहाटीवरून आमदारांमध्ये वाद, प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली.
 Eknath Shinde Group
Eknath Shinde GroupSaam TV
Published On

Bacchu Kadu vs Ravi Rana Latest News : राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. गुवाहाटीवरून दोन आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. प्रकरण इतकं पुढे गेलं की एका आमदाराने दुसऱ्या आमदाराविरोधात पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आता एका आमदारावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

 Eknath Shinde Group
IND vs PAK : बाबरला ती चूक नडली; विराटने तिथेच साधली संधी, वाचा नेमकं काय घडलं?

काय आहे प्रकरण?

शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. या आरोपांवरून बच्चू कडू आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. आज बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

'शिंदे-फडणवीसांची याचं उत्तर द्यावं'

आमदार रवी राणा यांनी आरोप केल्यानंतर बच्चू कडू अत्यंत आक्रमक झाले आहेत. 'रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्ष आमची राजकीय करिअर उभं करायला गेली. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल, तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी यांनी यांचं उत्तर दिलं पाहिजे', असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

 Eknath Shinde Group
धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट कृषी सचिवांना फोन; नुकसानीचे अहवाल तातडीने पाठवण्याच्या सूचना

या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहे. तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, अशी मागणी या नोटीसद्वारे करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. इतकंच नाही तर येत्या १ तारखेपर्यंत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावे, त्यांनी ते पुरावा सिद्ध करून दाखवले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेल तर त्याला कायमचा हिजडा म्हणून घोषित करू, असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला आहे.

रवी राणा काय म्हणाले होते?

अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी अलिकडेच अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. इतकंच नाही तर बच्चू कडू यांनी विधान परिषद आणि राज्यसभेसाठी पैसे घेतल्याचा आरोपही रवी राणा यांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com