IND vs PAK : बाबरला ती चूक नडली; विराटने तिथेच साधली संधी, वाचा नेमकं काय घडलं?

वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची जशी अपेक्षा असते, अगदी तसाच हा सामना झाला.
IND vs PAK T20 World Cup
IND vs PAK T20 World CupSaam TV
Published On

IND vs PAK T20 World Cup : टी २० विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची जशी अपेक्षा असते, अगदी तसाच हा सामना झाला. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यांत भारतीय संघाने (Ind vs Pak) ४ गडी राखून विजय मिळवला. पहिल्या षटकापासून सामन्यावर पकड मिळवलेल्या पाकिस्तान संघाला शेवटच्या षटकांत मात्र, पराभवाला सामोरे जावे लागले.

IND vs PAK T20 World Cup
IND VS PAK T20 : रनमशीनच! भारतासाठी कोहलीची पुन्हा एकदा 'विराट' खेळी

सामन्यांत नेमकं काय घडलं?

पाकिस्तानने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची (Team India) सुरूवात खराब झाली. भारतीय संघाचे दोन्ही सलामीवर फलंदाज (रोहित-राहुल) प्रत्येक ४-४ धावा करून माघारी परतले. केएल राहुलला नसीम शाह आणि रोहित शर्माला हारिस रौऊफने माघारी पाठवलं.

रोहित आणि राहुल बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादवने मैदानावर येत फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मात्र १५ धावांवर असताना सुर्यकुमार यादव बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला अक्षर पटेलही झटपट माघारी परतला. एकवेळ भारतीय संघाची स्थिती ४ बाद ३१ अशी झाली होती. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने विराट कोहलीसोबत सावध खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरला. विराटने कोहलीने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या यानेही ४० धावांचे योगदान दिले.

अन्... तिथेच कोहलीने विजय खेचून आणला.

शेवटच्या षटकांत भारतीय संघाला विजयासाठी ६ चेंडूत १५ धावांची आवश्यकता होती. बाबरने शेवटचं षटक डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजच्या हाती चेंडू सोपावला. हीच चूक बाबरला नडली. पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर विराटने चौकार आणि षटकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन षटकांत भारतीय संघाला तब्बल ३१ धावांची गरज होती. कोहलीने १९ व्या षटकांत हारिस रौऊफ दोन षटकार ठोकत, १५ धावा वसूल केल्या.

शेवटच्या षटकांत हाती १६ धावा असूनही षटक टाकणारा नवाज चांगलाच दबावात दिसला. त्याने टाकलेल्या नो बॉलवर विराटने षटकार ठोकला. तर पुढच्याच चेंडूवर म्हणजेच फ्री हिटवर कोहलीने ३ धावा वसूल केल्या. शेवटच्या दोन चेंडूवर भारताला विजयासाठी दोन धावांची गरज असताना, नवाबने कार्तिकला बाद करत वापसी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढचा चेंडू त्याने वाईड टाकल्याने सामना बरोबरीत आला. शेवटच्या चेंडूत एका धावाची गरज असताना आश्विनने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com