Dhananjay Munde
Dhananjay MundeSaam TV

धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट कृषी सचिवांना फोन; नुकसानीचे अहवाल तातडीने पाठवण्याच्या सूचना

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान व पीकविमा दोन्ही मिळाले पाहिजे - धनंजय मुंडे
Published on

रश्मी पुराणिक -

अंबाजोगाई : अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील शेती पिकांचे नुकसान पाहताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेतीच्या बांधावरून राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता तसेच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डावले यांना थेट फोन करून बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात पावसाने केलेल्या नुकसानीबाबत माहिती दिली आहे.

मागील काहि दिवसांमध्ये या भागात झालेल्या पावसाचे प्रमाण हे अतिवृष्टीच्या निकषांच्या कैक पटीने जास्त असून मागील दोन वेळा राज्य सरकारने शेतकऱ्यांना (Farmer) जी मदत दिली त्यात बीड जिल्ह्याला वगळण्यात आले होते. मात्र आताचे नुकसान पाहता कापूस, सोयाबीनसह सर्वच पिके हातची गेली आहेत.

पाहा व्हिडीओ -

त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक अनुदान व पीकविमा या दोन्हीही प्रकारची मदत करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी, कृषी विभाग व विमा कंपनीला योग्य ते आदेश देऊन तातडीने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची कार्यवाही करावी असं मुंडे यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.

Dhananjay Munde
Aurangabad News: शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारला भाग पाडू; बांधावर जात उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांना धीर

ऐन दिवाळीत आज अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसर तसेच चोपनवाडी, पिंप्री, पट्टीवडगाव या भागात पावसाने झालेल्या शेती नुकसानीची मुंडे यांनी आज पाहणी केली. या वेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच आपण राज्य सरकारकडे मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही सांगितलं.

राज्य सरकार स्थानिक प्रशासनाने दिलेल्या नुकसानीचा अहवाल पाहूनच त्यानुसार कार्यवाही करत असते, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शेती पिकांचे झालेले नुकसान पाहून व माणुसकी डोळ्यासमोर ठेऊन पंचनामे तातडीने पूर्ण करावेत असंही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com