Aurangabad News: शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारला भाग पाडू; बांधावर जात उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांना धीर

Uddhav Thackeray Aurangabad Visit: हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरवल्याने मराठवाड्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.
Uddhav Thackeray Aurangabad Visit
Uddhav Thackeray Aurangabad Visitमाधव सावरगावे
Published On

Uddhav Thackeray Aurangabad Visit: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज, रविवारी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील दहेगाव परिसरात शेतऱ्यांच्या बांधावर जात त्यांना धीर दिला.

हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरवल्याने मराठवाड्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मराठवाड्याचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत त्यांना धीर दिला आणि सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. (Aurangabad Latest News)

Uddhav Thackeray Aurangabad Visit
Xi Jinping: ते पुन्हा आले! शी जिनपिंग यांची सत्तेची हॅट्रीक; तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपद भूषवत बनवला 'हा' रेकॉर्ड

यावेळी औरंगाबादेतील (Aurangabad) शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दहेगावमध्ये पीक नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरें आपली व्यथा मांडली. साहेब आमची दिवाळी गोड करा असं म्हणत शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी धीर दिला. शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका, मी तुमच्यासोबत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच सरकारकडून मदत मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलं आहे.

Uddhav Thackeray Aurangabad Visit
Snake Kiss Viral Video : विषारी किंग कोब्राला केलं किस; थरारक व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

अनेक ठिकणी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

असा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा....

दुपारी 12.15 वा. औरंगाबाद विमानतळाहुन दहेगाव ता. गंगापुर कडे प्रयाण

दुपारी 01.00 वा. दहेगाव ता. गंगापुर येथे आगमन व दहेगाव शिवार येथे पीक नुकसानीची पाहणी

दुपारी 01.15 वा. पेंढापूर ता. गंगापुरकडे प्रयाण

दुपारी 01.30 वा. पेंढापूर ता. गंगापुर येथे आगमन व पीक नुकसानीची पाहणी

दुपारी 01.45 वा. पत्रकारांशी संवाद

दुपारी 02.45 वा. चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद प्रयाण

शिवसेनेतील बंंडानंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच दौरा

दरम्यान शिंदे गटाचं बंड आणि सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिला दौरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com