Snake Kiss Viral Video : विषारी किंग कोब्राला केलं किस; थरारक व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Snake Kiss Video: एक माणूस किंग कोब्राच्या डोक्यावर म्हणजेच जगातील सर्वात विषारी आणि धोकादायक सापाचे चुंबन घेताना दिसत आहे.
Snake Kiss Video
Snake Kiss VideoInstagram/@10_viper_21
Published On

Snake Kiss Viral Video : किंग कोब्रा हा सापाच्या प्रजातीतील सर्वात विषारी साप समजला जातो. कोब्रा सापाच्या (Snake) दंशानंतर (साप चावल्यानंतर) त्यातून जीव वाचणं दुर्मिळच आहे. त्याच्या भयंकर विषारीपणामुळे अनेक सर्पमित्रही किंग कोबराला पकडताना जीव मुठीत धरुन काम करतात. मात्र, सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) हातोय, जे पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्हायरल व्हिडिओत एक सर्पमित्र विषारी किंग कोबराला चक्क किस करतोय. (King cobra Kiss Video)

पाहा व्हिडिओ -

इंस्टाग्रामवर हा थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून कोणाचेही मन घाबरून जाईल. या व्हिडिओमध्ये एक माणूस किंग कोब्राच्या डोक्यावर म्हणजेच जगातील सर्वात विषारी आणि धोकादायक सापाचे चुंबन घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो माणूस हळू हळू सापाजवळ जाऊन काही वेळाने त्याचे चुंबन घेतो. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे सापानेही त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता काहीच केले नाही. (Latest Marathi News)

स्नेक मॅन ऑफ केरळ | Snake Man Of Kerala

हृदयाला धडकी भरवणारा हा व्हिडिओ सौरभ जाधव जाधव नावाच्या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. या व्हिडिओत सापाला किस करणारे हे सर्पमित्र वावा सुरेश असल्याचं सांगण्यात येत आहे. सुरेश हे केरळमधील लोकप्रिय सर्पमित्र आहेत. त्यांनी आतापर्यंत 38 हजार साप पकडले आहेत. काही लोक या माणसाला 'स्नेक मॅन ऑफ केरळ' (Snake Man Of Kerala) असेही म्हणतात. या व्यक्तीने आतापर्यंत 190 हून अधिक किंग कोब्राची सुटका केल्याचेही सांगितले जात आहे.

Snake Kiss Video
कोब्राचे चुंबन घेणे युवकाला पडले महागात; वाचा काय आहे प्रकार...

तुम्ही असं धाडस करु नका!

कोब्रा सापासारखे वन्य प्राणी हे खूप धोकादायक असतात. त्याचा एक दंश जर झाला तर त्यामुळे तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारांपासून युवकांनी दूरच राहिले पाहिजे. सध्या सर्प मित्र होण्याची एक क्रेज लोकांमध्ये तयार होत आहे. तर त्यांनी कुठेतरी योग्यरीत्या प्रशिक्षण घेऊन योग्य जबाबदार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली अश्या प्राण्यांना त्यांनी हाताळणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या प्राण्याच्या जीवास धोका होऊ नये आणि जो त्याला हाताळत असतो, त्याच्या जीवास धोका होऊ नये म्हणून जबाबदारीने रेस्क्यू चे कार्य करावे. पण, तुम्ही असलं नसतं धाडस करु नका असं आवाहन आम्ही आमच्या वाचकांना करत आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com