कोब्राचे चुंबन घेणे युवकाला पडले महागात; वाचा काय आहे प्रकार...

या युवकाने कोब्राचे चुंबन घेतानाचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. वन विभागाच्या नजरेस हा प्रकार आला या युवकाचा वन अधिकाऱ्यांनी शोध घेऊन कडक कारवाई केली आहे.
कोब्राचे चुंबन घेणे युवकाला पडले महागात; वाचा काय आहे प्रकार...
कोब्राचे चुंबन घेणे युवकाला पडले महागात; वाचा काय आहे प्रकार...सुरेंद्र रामटेके
Published On

वर्धा : कोब्रा या विषारी सापाचे चुंबन घेणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. या युवकाने कोब्राचे चुंबन घेतानाचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. वन विभागाच्या नजरेस हा प्रकार आला आणि त्यांनी या युवकाची शोध मोहीम हाती घेतली. या युवकाचा वन अधिकाऱ्यांनी शोध घेऊन कडक कारवाई केली आहे.

एक मुलगा कोब्रा जातीच्या सापाचे किस घेतो/त्याचं चुंबन घेतो आहे असा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर हा व्हिडीओ वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यावर तातडीने या युवकाचा शोध घेतला. सदर युवक हा वर्ध्यातील रहिवासी असून त्याचे नाव अभिनव जोशी (21) असे आहे. त्याने हा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या युवकाला वनविभागाने अटक केली आणि कोर्टात हजर करून त्याला न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे.

सदर युवक स्वतः साप पकडुन तो जंगलात सोडून द्यायचा. पण तपासात असे पुढे आले की, हा युवक बऱ्याचदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या बाबत कल्पना द्यायचा नाही. व्हिडिओ बनवण्यामध्ये किंवा अजून अन्य प्रकारचे गैरकृत्य अशा वन्य प्राण्यांसोबत करत आहे का याबाबत चौकशी करणार आहे. कारण हे सर्व वन्यप्राणी भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 नुसारउच्च दर्जाचे संरक्षण प्राप्त प्राणी आहेत. यात समाविष्ट सर्व गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असून या संदर्भात प्राण्यांची छेड करणे, परस्पर प्राण्याचे प्रदर्शन भरवणे हे वन कायद्यानुसार गंभीर गुन्हे आहेत. असे वन विभाग वर्ध्याचे राउंड ऑफिसर रुपेश खेडकर यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, सर्पमित्रांना आमचा विरोध नाही किंवा वन विभागाचा विरोध नाही सर्पमित्र हे खरंच चांगलं काम करत आहेत. सापांना रेस्क्यू करून त्यांना नवीन जीवन तर देतातच ते योग्य आहे त्याला विरोध नाही. पण यात काही व्यक्ती अथवा युवक असे गैरप्रकार प्रकार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करतात व त्यातून काही प्रसिद्धी मिळवणे असा त्यांचा उद्देश असेल तर तो पूर्णतः चुकीचे आहे.

कोब्राचे चुंबन घेणे युवकाला पडले महागात; वाचा काय आहे प्रकार...
राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

रुपेश खेडकर यांनी युवकांना आवाहन केले आहे, की कोब्रा सापासारखे वन्य प्राणी हे खूप धोकादायक असतात. त्याचा एक दंश जर झाला तर त्यामुळे तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारांपासून युवकांनी दूरच राहिले पाहिजे. सध्या सर्प मित्र होण्याची एक क्रेज लोकांमध्ये तयार होत आहे. तर त्यांनी कुठेतरी योग्यरीत्या प्रशिक्षण घेऊन योग्य जबाबदार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली अश्या प्राण्यांना त्यांनी हाताळणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या प्राण्याच्या जीवास धोका होऊ नये आणि जो त्याला हाताळत असतो, त्याच्या जीवास धोका होऊ नये म्हणून जबाबदारीने रेस्क्यू चे कार्य करावे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com