Marigold : लक्ष्मीपूजनासाठीची तयारी सुरु; झेंडूला मागणी वाढली, दर गडगडला

आज लक्ष्मीपूजना निमित्त झेंडूच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली आहे.
Diwali 2022, Marigold, Nandurbar, Parbhani
Diwali 2022, Marigold, Nandurbar, Parbhani saam tv
Published On

Marigold : दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन व वाहनांच्या पूजेसाठी झेंडू फुलांची मागणी वाढली आहे. त्यासाठी झेंडू फुलांच्या दुकानांनी बाजारपेठा सजल्या आहेत. राज्यात सर्वत्र झालेला पाऊस आणि परतीचा पाऊस यामुळे काही ठिकाणी झेंडू (marigold) खराब झाला. बहुतांश ठिकाणी झेंडूला नेमका किती दर मिळताे याची शेतक-यांना चिंता हाेती. नंदूरबारला उत्तम दर मिळाल्याचे सांगितलं जात आहे तर परभणीत झेंडूला म्हणावा तसा दर मिळालेला नाही अशा भावना विक्रेत्यांच्या आहेत. (Diwali Latest Marathi News)

परभणीत यंदाच्या दिवाळीत झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना बुरे दिन आले आहेत. दिवाळीच्या सणात झेंडू फुलांची वीस रुपये ते तीस रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे उत्पादन खर्च निघतो की नाही यांची चिंता झेंडू उत्पादकांना लागली आह़े. (Maharashtra News)

Diwali 2022, Marigold, Nandurbar, Parbhani
Elgar Morcha : एल्गार मोर्चा; 'बळीराजाच्या हितासाठी पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊन एकत्र या'

यंदा झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. चांगले उत्पादन ही मिळाले पण परतीच्या पावसाने झेंडू खराब झाला. खराब झेंडू व आवक जास्त झाली. त्यावर बाजारात ग्राहकांनी (citizens) झेंडू खरेदीकडे पाठ फिरवल्याने भावात घसरण झाली. ग्राहक सकाळी झेंडू खरेदी करतात दुपारी हीच परिस्थिती राहिली तर झेंडू फेकून द्यावा लागणार असल्याने आणण्याचा खर्च निघतो की नाही यांची चिंता झेंडू उत्पादकांना लागली आह़े.

Diwali 2022, Marigold, Nandurbar, Parbhani
Narak Chaturdashi 2022 : कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडीत नरकासुराचे दहन; दिवाळीचा उत्साह शिगेला

नंदुरबारात झेंडूची मागणी वाढली

कोरोना काळाच्या गेल्या दोन वर्षानंतर यंदा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. लक्ष्मीपूजन तसेच वाहनांची पूजा करण्यासाठी भाविक झेंडू फुलांची खरेदी करताना नंदूरबार शहरासह जिल्ह्यात दिसून येत आहेत. यंदा झेंडू फुले 50 ते 60 रुपये दराने बाजारात विक्री होत आहे. ग्राहकांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत असून दर समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Diwali 2022, Marigold, Nandurbar, Parbhani
Diwali 2022 : नरकासुराचे दहनानंतर काेकणवासीयांनी तुळशीवृदांवना समोर फाेडलं 'कारिट'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com