Chhagan Bhujbal  Saam tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा एल्गार; काय आहे येवल्यातील मतांचं गणित? पाहा व्हिडिओ

Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले नसले तरी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला होता. त्याची सुरुवात जरांगेंनी भुजबळांच्या मतदारसंघातून केलीय.. नेमकं जरांगेंनी येवल्यात मराठा समाजाला काय आवाहन केलंय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

नाशिक : मनोज जरांगेंनी विधानसभा लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय...मात्र मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुफडा साफ करणार असल्याचं स्पष्ट केलंय.. त्यापार्श्वभुमीवर जरांगेंनी ओबीसी नेते छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात सभा घेत छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना पराभूत करण्याचा अप्रत्यक्ष संकेत दिलेयत.. तर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, हे जरांगेंचं म्हणणं बरोबर असल्याचं भुजबळांनी म्हटलंय...

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा 9 मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसला. त्यातच आता विधानसभेसाठी जरांगेंनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडण्याचं आवाहन केलंय... यावेळी जरांगेंचा रोख भुजबळांच्या दिशेने होता. त्यामुळे अप्रत्यक्षपणे जरांगेंनी माणिकराव शिंदेंना पाठींबा देण्याचे संकेत दिलेत. मात्र येवल्यातील 2019 मधील मतांचं समीकरण कसं होतं? पाहूयात.

2019 मधील मतांचं गणित

छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस, 1 लाख 26 हजार 237

संभाजी पवार, शिवसेना, 69 हजार 712

56 हजार 525 मतांनी भुजबळांचा विजय

2004 नंतर येवल्यातून छगन भुजबळांच्या मतांमध्ये वाढ होत गेलीय. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भुजबळांनी फसवणूक केल्याचा आरोप करत पवारांनी हल्लाबोल केलाय.. त्यातच 1 लाख 22 हजार मराठा मतदार असलेल्या येवल्यात सभा घेत जरांगेंनी भुजबळांची कोंडी केलीय. त्यामुळे येवल्यात मराठा विरुद्ध ओबीसी लढत होण्याची चर्चा रंगलीय.

मात्र मराठा समाज जरांगेंचा सूचक संदेश लक्षात घेऊन भुजबळांचा पराभव करणार की सर्वजातीय नेत्यांची मोट बांधून भुजबळ विजयाची वाट सोपी करणार? हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

SCROLL FOR NEXT