Sharad Pawar : छत्रपती संभाजी महाराजांसोबत गणोजी शिर्केने गद्दारी केली, त्याला कधी सोडलं का? शरद पवारांचा दिलीप वळसेंवर नेम

Sharad Pawar on Dilip Walse patil : शरद पवारांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवारांनी पहिल्यांदा गद्दार शब्दाचा प्रयोग करून अजित पवार गटावर टीका केली.
Sharad Pawar news
Sharad Pawar-Dilip Walse PatilSaam Tv
Published On

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडून महायुतीसह अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात आहे. राष्ट्रवादीच्या फुटीवरून शरद पवारांनी आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिलीप वळसे पाटील हे गद्दार आणि आता गद्दारांना सुट्टी नाही, असं बोलत शरद पवारांनी मोठा इशारा दिला आहे.

शरद पवार हे आज पुण्यातील आंबेगावात दौऱ्यावर आहेत. या मतदारसंघातील प्रचारसभेत पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांना विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले. तर या मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावरही पवारांनी तोफ डागली.

शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे

आंबेगाव तालुक्याचं अन माझं एक अतूट नातं आहे. अगदी दिलीप वळसे यांना मी संधी देण्याआधी पासून माझं या तालुक्याशी संबंध येत गेला आहे. दिलीप वळसे यांना मी संधी दिली. ते आमदार झाले, याचा मला आनंद होता. पुढं मी त्यांना मंत्री केलं. विविध पदं दिली. विश्वास ठेवला, संधी दिली. जे जे शक्य होतं, ते दिलं.

मी ज्यांना पद दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्यानं जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नाही.

माझी पत्नी वर्षातून एकदा भीमाशंकरला जाते, आता अलीकडेही भीमाशंकरला आली. मी विचारलं नेहमी सारखी व्यवस्था होती का? त्या म्हणाल्या यावेळी दिलीप वळसेंच्या घरी गेलीच नाही, थेट भीमाशंकर दर्शन घेऊन परतले.

आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांसोबत गणोजी शिर्केने गद्दारी केली, त्याला कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकम यांना आमदार बनवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com