अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचारसभेत शरद पवार यांच्या आरोपांना उत्तर दिलं. त्याचबरोबर त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला नगरसेवक, महापौर केलं. याबद्दल अनेकदा त्यांचे आभार मानलेत. आता शरद पवार का बोलले? मला कळत नाहीये. शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवार यांनीच केले,असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय. भुजबळ यांच्या प्रत्युत्तराने राजकारणात खळबळ उडालीय.
मुख्यमंत्रिपदावरून शरद पवारांनी केलेल्या विधानावर बोलताना छगन भुजबळ यांनी थेट सवाल केलाय. 2004 ला मुख्यमंत्री केलं असतं, बरं मला नाही केलं, आर. आर. पाटील, अजित दादा ना का नाही केलं? सुधाकरराव नाईक यांना पावरांनी मुख्यमंत्री केलं, जेव्हा ते दिल्लीला गेले होते, नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात गेले होते. नाईक यांच्याशी टोकाचे मतभेद झाले तेव्हा दंगे झाले होते. नरसिंह राव यांनी परत शरद पवारांना महाराष्ट्रात पाठविले. मुख्यमंत्री केल्यावर वरचढ होतात म्हणून त्यांनी ना भुजबळ, आर. आर. पाटील, अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं नाही, असा गौप्यस्फोट केलाय.
पवार कधीपासून भविष्य पाहायला लागले ? मला काहीही दोष नसतांना तेलगी प्रकरणात मला उगाच गोवलं गेलं. ऑफिसर मधील वाद होते, मला राजीनामा द्यायला लावला. हल्ला झाला मला माहिती नव्हते, म्हणून लोक चिडले म्हणून सांगितले.
शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांनी ताबडतोब बोलून घेतले. पटेल म्हणाले राजीनामा द्यायला पाहिजे. मी राजीनामा द्यायच्या आधीच त्यांनी राजीनामा देणार म्हणून जाहीर करून टाकलं. काही घटना विचित्र वाईट घडत होत्या. मुकेश गांधी यांनी मला तेव्हा मदत केली. सुप्रीम कोर्टात गेलो. तेलगी प्रकरण तीन ते चार राज्यातील होतं. त्यामुळे सीबीआयकडे प्रकरण गेले तेव्हा वाजपेयी सरकार होते. येथे माझे सरकार होते. तेव्हा माझी मागणी होती, येथे नको तिकडे सीबीआयकडे द्या. मॅटमध्ये तक्रार गेल्यावर हे प्रकरण सांगितलं. समीरला ही बोलावले.
गाडीभर कागद गोळा झाले पण भुजबळ नाव एकही कागदावर नाव नव्हतं. भुजबळचा ग्राफ चढता होता तो खाली आला. माझ्या मनात शंका होती तर बाकीचे होते, कुणालाही मुख्यमंत्री केलं नाही. सुधाकर नाईक यांचे उदाहरण डोळ्यासमोर आहेच. आज सर्व बोलणार नाही, काँग्रेसचा विरोधी पक्षनेता, वन मॅन आर्मी शिवसेना भाजप विरोधात लढत होतो. माझ्यावर प्रचंड मोठा हल्ला झाला, मी देवाच्या कृपेने वाचलो. बाळासाहेब माझी टिंगल करत होते. लाखोबा म्हणाले काही काळ मी भांडलो पण नंतर जाऊन भेटलो.
काँग्रेसने शरद पवार यांना बाजूला केलं तेव्हा भुजबळ पहिला माणूस त्यांच्याबरोबर होता. कलमाडी, वासनिक होते, सगळेच मला बोलत होते जाऊ नका. पवार साहेबांसाठी मी लढलो, माझ्यावर हल्ला झाला तेव्हा ते फ्लाईट ने आले होते भेटायला, मला काही दिले असेल तर मी लढलो म्हणून. आत्ताच या गोष्टीकढण्याचा काय अर्थ होता ? बडे मुर्दा उखडणे चांगलं नाही, उकरायला लागलो तर बात लंबे तक जयेगी.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.