बदलापूरजवळील भोज धरणातील बंधाऱ्यावर मस्ती करणं एका पर्यटकाच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकलेल्या या तरुणाने जीव वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू केली.ही घटना घडताच त्याचे मित्र तत्काळ मदतीला धावले आणि सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. एका मित्राने बंधाऱ्यावरून काठीचा आधार देत त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, इतर पर्यटकांनी एकमेकांची साखळी बनवत त्याला पाण्याबाहेर ओढून काढले.
शेवटी या सामूहिक प्रयत्नांमुळे या पर्यटकाचा जीव वाचवण्यात यश आल आहे. हा सारा प्रकार अत्यंत थरारक असून काही क्षणांतच मोठा अपघात घडू शकला असता.प्रशासनाकडून पर्यटकांना वारंवार सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असतानाही अनेकजण धोकादायक ठिकाणी फोटो किंवा व्हिडीओसाठी जीव धोक्यात घालतात, ही बाब गंभीर चिंता निर्माण करते आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.