Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक ४ जुलै २०२५, आषाढी वारी, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, मनसे-शिवसेना मेळावा, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार कोरोना अपडेट अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सामर लेणीच्या पायथ्याशी एका अज्ञात ट्रक चालकाचा अज्ञात संशयत निखून केला असल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर या ट्रकचालकाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसांनासमोर होते. या गुन्हेचा समांतर तपास करीत असतांना गुन्हे शाखा युनिट एकाला यश आले. यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खून करणाऱ्या चार संशयतांना ताब्यात घेतले आहे.

Dharashiv : धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

धाराशिवातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी विद्यालयात १७ मुलींना विषबाधेचा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती

ताप, पोटदुखी सह मळमळ झाल्याने रुग्णालयात दाखल

चार मुली गंभीर असल्याने उमरगा उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल

आरोग्य विभागाची टीम शाळेवर दाखल नेमकी विषबाधा कशाने झाली याचा करत आहे तपास

Igatpuri : इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

- इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो झाला आहे .

- इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भावली १०० टक्के भरलं

- नाशिक जिल्ह्यातील १०० टक्के भरणारे भावली पहिलं धरण

- धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू

- भावली धरण १०० टक्के भरल्याने पर्यटकांची होऊ लागली गर्दी

Nagpur : देवेंद्र फडणवीसांना दिलासा; ती याचिका कोर्टाने फेटाळली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील निवडणूक याचिका फेटाळली.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली याचिका

दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे पराभूत काँग्रेस उमेदवार प्रफुल गुडधे यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Manoj Jarange : एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात नाऱ्यावर प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हणणं हे चांगलं नाही. माझी प्रतिक्रिया खूप असते, पण मी ते ऐकलं नाही, त्यामुळे त्याच्यावर आता बोलणार नाही. तुम्हाला हिंदी सक्ती करायची, तर देशात मराठी शक्ती करा ते होणार का?

Solapur : नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

नोकरी मिळाली नाही म्हणून एनटीपीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने शेतात आत्महत्या केली.

नातेवाईक आणि ग्रामस्थांचे एनटीपीसीच्या समोर मृतदेह ठेवून आंदोलन सुरु

सिंदेवाही-टेकरी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात खड्ड्यात बसून आंदोलन

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही ते टेकरी या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांनी खड्ड्यात बसून आंदोलन केले.

आंदोलनाच्या ठिकाणी नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

प्रशासनाच्या सुस्त कारभाराचा निषेध करत, पुढील १५ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

सिंदेवाही-टेकरी हा रस्ता टेकरी, वाकल, वाणेरी, जामसाळा जुना, जामसाळा नवीन, मोहाळी, नलेश्वर, पांगडी तसेच आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी दररोजच्या प्रवासाचा प्रमुख मार्ग आहे.

याशिवाय, सिंदेवाहीचा आठवडी बाजारही याच रस्त्यावर भरतो.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाण्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र जल्लोष

हिंदी सक्ती दोन्ही धोरण महायुती सरकारने रद्द केल्यानंतर...उद्याच्या विजयी मेळाव्या निमित्त आज पासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे जल्लोष साजरा करत आहे....

ठाण्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र जल्लोष

उद्याच्या विजय मेळाव्याच्या आधी ठाण्यात आनंदाचे वातावरण

दोन्ही पक्षाकडून कार्यकर्ते एकाच बॅनरखाली जमायला सुरुवात...

ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या हरी निवास सर्कल या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी एकत्र येऊन जल्लोष करत आहेत.

पेरलेलं सोयाबीनचे बियाणं उगवलच नाही, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवसंकट

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आता नवसंकट उभा टाकल आहे.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व आणि मान्सून नंतर पेरणी केली. नांदेड जिल्ह्यात उडीद, मूग, कापूस, या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे.

परंतु नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी आता कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत.

पाचशेच्या वर जिल्ह्यातून ह्या तक्रारी आल्या आहेत.त्यामुळे शेतकरी या समस्येमुळे हवालदिल आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देळूब या गावातील शेतकऱ्यांसमोर देखील असंच संकट उभ टाकल आहे.

देळूब या गावातील जवळपास आठ ते दहा शेतकऱ्यांचे सोयाबीनचे बियाणं उगवलं नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

या गावातील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.

'मराठी शिकणार नाही काय करायचं बोल...', उद्योगपती सुशील केडियांचं राज ठाकरेंना आव्हान

मराठी-हिंदी भाषा वादात सुशील केडियांची उडी

मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहतो असेही केडिया म्हणाले

राज ठाकरेंना ट्विटरवर टॅग करुन खुलं आव्हान

थकीत बिलांवरून रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदार संघटना आक्रमक

जिल्ह्यातील पाचशेहुन अधिक ठेकेदारांची सातशे ते आठशे कोटींची बिलं लटकली

केलेल्या कामाचे पैसे न मिळत नसल्याने ठेकेदार हतबल

आर्थिक कोंडीमुळे बँकांची देणी थकली

शासनाकडून गणेशोत्सवापूर्वी बिलं मिळावीत यासाठी ठेकेदारांचं प्रशासनाला निवेदन

जिल्ह्यातील बहुसंख्य ठेकेदार होते उपस्थित

राज्यातील थकीत बिलांची स्थिती

सार्वजनिक बांधकाम विभाग - ४० हजार कोटी

जलजीवन मिशन अंतर्गत कामे - १२ हजार कोटी

ग्रामविकास विभाग - ६ हजार कोटी

जलसंधारण व जलसंपदा विभाग - १३ हजार कोटी

नगरविकास अंतर्गत विशेष ४२१७ निधी, DPDC फंड, २५१५ ग्रामीण सुधारणा विभाग कामे - १८ हजार कोटी

कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

कल्याण शहराच्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये खर्चून २०१९ साली गोविंदवाडी बायपास मार्गावरील नाल्यावर उभारण्यात आलेल्या पुलाची अवघ्या केवळ सहा वर्षांत दैना उडाली आहे. पुलाच्या कॉन्क्रीटला जागोजागी तडे पडले, खपल्या उडाल्या, आणि सळ्या उघड्या पडल्याने या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे .

बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

बोरिवली पूर्वेतील देवीपाडा मेट्रो स्टेशनजवळील रिअॅलिटी बोरिवली अविरही एसआरए कॉर्पोरेशन हाऊसिंग सोसायटीच्या प्रकल्पात रविवारी सकाळी मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास एक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरण

संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायालयाचा निकाल

सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

वंचितचे प्रमुख एड प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथच्या आईच्या वतीने दाखल केली होती याचिका

स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात मांडली होती न्यायालयात बाजू

सायंकाळी ५ वाजता प्रकाश आंबेडकर याच प्रकरणात पुण्यात घेणार प्रेस

शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले.

दिशाहीन जुहूचा निब्बर असे म्हणत ट्विट करून नितेश राणेंना डिवचले.

उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी, आणि आवाज कोंबड्यासारखा किकीक करणारा…

असा हा ‘दिशाहीन’ जुहूचा निब्बर ओळखा पाहू कोण? असं ट्विट करत नितेश राणेंना डिवचले.

मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना. नागपूरहून ४० ते ५० मनसे सैनिक मुंबईच्या दिशेनं रवाना. ठाकरे बंधूच्या मेळाव्यासाठी मोठा उत्साह.

मनमाड-इंदौर महामार्गावर आज पुन्हा ट्राफिक जाम

मनमाड-इंदौर महामार्गावर आज पुन्हा ट्राफिक जाम.

रेल्वे पुलावर अवजड वाहन नादुरुस्त झाल्याने वाहतूक ३ तासांपासून ठप्प.

येवल्याकडे जात असताना रेल्वे उड्डाण पुलाच्या मध्यावर ट्रक नादुरुस्त.

ट्रक नादुरुस्त झाल्याने अवजड वाहनाच्या 3 किमी पेक्षा जास्त मोठ्या रांगा.

पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न.

वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांचे हाल.

नादुरुस्त वाहन बाजूला करण्याचा प्रयत्न.

आमदार संग्राम जगताप यांना गोळी घालण्याची धमकी; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर दौंड येथील एका राजकीय पदाधिकाऱ्याने आमदार संग्राम जगताप यांचे नाव घेऊन अश्लील व शिवराळ भाषण केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली आहे. आमदार संग्राम जगताप यांचे खाजगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांना मोबाईल मेसेजच्या माध्यमातून "आमदारांना गोळ्या घालू" अशी थेट धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. त्यांनी आमदार संग्राम जगताप यांना धमकी देणाऱ्या व्यक्तींना त्वरित अटक करण्यात यावी व आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली.

Maharashtra Politics: आमदार संग्राम जगताप यांन धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षनात वाढ

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची प्रकार भूमिका घेतल्यामुळे राज्यभरातून त्यांच्या विरोधात आंदोलने सुरू झाले आहेत. तसेच दौंड येथील एका राजकीय पदाधिकाऱ्याने आमदार संग्राम जगताप यांचे नाव घेऊन शिवराळ भाषण केले होते. तर त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांना मेसेज द्वारे आमदार संग्राम जगताप यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन आमदार संग्राम जगताप यांना धमकी देणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी व त्यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली होती.

Weather: हवामान कसं असणार याचा अंदाज सेन्सर बेस उपकरणाद्वारे करणार

पाऊस पडणार की नाही हे आपण ढगाळ वातावरण पाहून किंवा नक्षत्र पाहून अंदाज बांधतोय.. पण हवामान विभागाची मात्र हा अंदाज बांधण्यासाठी शास्त्रीय पद्धत आहे.हवामान विभाग पाऊस, वारा आणि तापमान याचा अंदाज लावण्यासाठी खास सेन्सर बेस उपकरणाचा वापर केला जातोय...

माहिती गोळा करण्यासाठी दृश्यात दिसणारा हा खास पद्धतीचा बलून आकाशाच्या दिशेने सोडल्या जाते.हे बलुन रोज पहाटे 4.30 ते 5 वाजता दरम्यान तर संध्याकाळी 4.30. ते 5 वाजता दरम्यान सोडले जात असतात.देशभरतील 56 केंद्रावर असे बलून सोडले जात असतात..हे बलून 35 ते 50 किलोमीटर उंच जातात.

उद्याच्या मेळाव्यासाठी राज्यातून मनसैनिक, शिवसैनिक मुंबईत येणार

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात दाखल होण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक होणार थोड्या वेळात अमरावती वरून मुंबई ला होणार रवाना..

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अमरावतीतून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना..

30 ते 40 मनसैनिक आणि ठाकरेच्या सेनेचे 30 सैनिक थोड्या वेळात मुंबई कडे निघणार..

अमरावतीत विश्राम गृह परिसरात कार्यकर्ते एकवटायला सुरुवात..

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या भरपाईची प्रकरणे प्रलंबित

महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी राज्य विधानसभेत माहिती दिली की, मराठवाडा आणि विदर्भात मार्च २०२५ मध्ये २५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि एप्रिल २०२५ मध्ये २२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मार्चमध्ये झालेल्या २५० शेतकऱ्यांपैकी १०२ जण सरकारी भरपाईसाठी पात्र होते, ६२ जण अपात्र होते आणि ७७ प्रकरणे चौकशीच्या अधीन आहेत. एप्रिलमध्ये झालेल्या २२९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपैकी ७४ जण भरपाईसाठी पात्र होते, ३१ जण अपात्र होते आणि १२४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

Palghar: पालघरमध्ये पुरात अडकलेल्या एकाला वाचवण्यात यश..

पालघर जिल्ह्यात पहाटेपासून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत असून नदी नाले प्रभावित व्हायला सुरुवात झाली आहे. देहर्जे-शीळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने पूल पार करतांना पांडुरंग मेरे ( रा .हातणे ) या नागरिकांला पाण्याचा अंदाज न आल्याने पुलावर गेल्यावर अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हा नागरिक पुराच्या पाण्यात पुलावर पाण्याच्या प्रवाहात अडकला होता. प्रशासनाच्या व नागरिकांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

Kolhapur: कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार सुरु

कोल्हापूर शहरात पावसाने जरी उसंत घेतली असली तरीही जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरण 73 टक्के भरले असून पंचगंगा नदी ही 33 फुटांवरून वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजीत माजगांवकर यांनी.

Kalyan: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा

कल्याण शीळ रोड वरील पलावा पुलाचे लोकार्पण

कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते लोकार्पण

गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या पलावा पुलाचे लोकार्पण

Pune: पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर मनसे आक्रमक...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा अडवत आंदोलन करणार असल्याचा इशारा...

अमित शहा विरोधात घोषणाबाजी सुरु आहे

काहीही झालं तरी आम्ही अमित शहाचा ताफा अडवणार...

पोलिसांनी ताब्यात घेतलं तरी आम्ही गनिमी काव्याने आंदोलन करणार

Mumbai: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

- नाशिक शहरात विजयी मेळाव्याची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी

- बॅनर्सवर मध्यभागी हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा तर एका बाजूला राज ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो

- चलो मुंबई, मनसेची नाशिककरांना हाक

- शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन सकाळी मुंबईला मेळाव्यासाठी निघण्याचं मनसेचं नियोजन

- मोठं शक्ती प्रदर्शन करत मनसैनिक मुंबईला होणार आहेत रवाना

Mumbai:  मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचं आज मुंबईत आंदोलन आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

Laxman Hake: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या लक्ष्मण हाकेंचा नांदेडमध्ये राष्ट्रवादीकडून निषेध.

ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते. लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नांदेडमध्ये देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा तीव्र निषेध केला. नांदेड शहरातील आयटीआय चौकात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी माफी मागावी, अन्यथा लक्ष्मण हाके यांना राज्यात फिरू देणार नाही, लक्ष्मण हाके यांनी जे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपमान केला आहे त्याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी दिला आहे.

जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशा यांनी बांधली लग्नगाठ

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात एक अनोखा रिसिप्शन सोहळा पार पडलाय.. अंध असलेल्या वधू आणि वराने आंतरजातीय विवाह केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून त्यांच्यासाठी हा खास रिसिप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता.. वधू वराला शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातील अंध बांधवांसह राहाता परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी देखील आवर्जून उपस्थित होती..

शाळेच्या बसला अपघात, विद्यार्थी जखमी,संगमनेर तालुक्यातील घटना -

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शाळेच्या बसला अपघात झाला आहे.. नाशिक - पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात हा अपघात झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या बसमध्ये 35 हून अधिक विद्यार्थी होते..

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात

मंदिरासमोर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुसाट कारने उडवले

सुसाट असलेल्या कारणे जवळपास 5 ते 6 जणांना चिरडले

दोघेजण जागेवरच ठार झाल्याची प्राथमिक माहिती तर 4 जण गंभीर जखमी

शहरातील सिडको भागातील काळा गणपती मंदिरासमोरील घटना

मंदिराच्या पायऱ्या जवळ रक्ताचे थारोळे

जखमींना तातडीने रुग्णालयात करण्यात आले दाखल

Pune: पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

काल मनसेचे हेमंत संभूस आणि काही कार्यकर्त्यानी राज ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या केदार सोमण याच्या घरी जाऊन त्याला मारण्याच्या तयारीत होत यावेळी पोलीस पोचल्यावर त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना बाहेर घेऊन गेले आणि केदार सोमण याला चौकशी साठी पोलीस ठाण्यात घेऊन गेले चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले.

त्यांनतर मात्र आज सकाळपासून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. मात्र घटनेवरून ताब्यात घेतले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 2 जण जागीच ठार 3 जण गंभीर जखमी...

समृद्धी महामार्गावर वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक 215 वर पुण्यावरून नागपूरच्या उमरेडला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झालाय.. नागपूर कॉरिडॉरवर वाहन चालकाचे आर्टीगा कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडरला धडकून अपघात झालाय. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, वाहनातील 3 जन गंभीर जखमी झाले आहेत. यात वैदीही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा जागीच मृत्यू झाला असून चेतन जयस्वाल,राधेश्याम जयस्वाल आणि संगीता जयस्वाल हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाशिम इथं उपचारार्थ दाखल करण्यात आले.

पुण्यात अनेक भागात प्रचंड वाहतूक कोंडी

सकाळपासून अनेक भागात वाहतूक कोंडी

सिंहगड रोड, वारजे वडगाव भागात वाहतूक कोंडी झाली आहे

वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

दुसरीकडे अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्यामुळे ही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे

गोदावरी नदी पात्रात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

- दसक घाटावरील गोदावरी नदीपात्रातील महिलेचा मृतदेह रेस्क्यू ऑपरेशनने काढला बाहेर

- नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

- मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम नाशिकरोड पोलिसांकडून सुरू

- मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्याकरिता अग्निशामक दलाने केले रेस्क्यू

Pune: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पुणे -

अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस

वारजे भागात पोलिसांच्या तपासणीत एकाला अटक

वारजे माळवाडी पोलिसांनी २१ वर्षीय सागर मुंडे याला केली अटक

न्यायालयाने सागर मुंडे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे…

Pandharpur: आषाढी वारी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरात ५ लाख भाविक दाखल

पंढरपूर -

आषाढी वारी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरात ५ लाख भाविक दाखल झाले आहेत.

पंढरपुरात मठ आणि मंदिरांमध्ये विठू नामाचा गजर सुरू आहे अवघी पंढरी नगरी विठू नामाच्या जय गजराने न्हाऊन निघाली आहे.

विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर गेली आहे दर्शन रांगेत जवळपास 60 हजाराहून अधिक भाविक आहेत.

Pune: पिटबूल कुत्र्याच्या हल्ल्यात एक जण जखमी, मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी 

पुणे -

पुण्यातील सोमजी चौकातील पेट्रोल पंपाच्या मालकाच्या पाळीव पिटबूल कुत्र्याचा हल्ला

कोंढव्यातील धक्कादायक घटना

मालकावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी.

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाला पिटबुलने घेतला चावा

पुण्यातील धक्कादायक प्रकार पाहा व्हिडिओ

Raigad:  महाड तालुक्यातील पावसाळी पर्यटनावर निर्बंध

रायगड -

० महाड तालुक्यातील पावसाळी पर्यटनावर निर्बंध

० नाणेमाची धबधब्यावर स्टंटबाजीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

० भारतीय नागरी सुरक्षा संहीता 2023 कलम 163 / 3 नुसार पावसाळी पर्यटनावर निर्बंध

० महाड प्रांताधिकारी पोपट ओमासे यांनी काढले आदेश

० पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांकडून होणाऱ्या अतीरेकाच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

० महाड तालुक्यातील नाणेमाची, मांडले, केंबुर्ली, चांभार खिंड या सह सर्व धबधबे, धरण आणि नदी नाल्यांवर धोकादायक पद्धतीने पर्यटनाला बंदी

० 31 ऑगस्ट पर्यंत निर्बंध लागू रहणार

Wardha: बिस्किट घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, हिंगणघाटच्या नंदोरी रोडवरील घटना

वर्धा -

- ट्रकला आग, ट्रकसह बिस्कीटचे नुकसान

- हिंगणघाटच्या नंदोरी रोडवरील कडाजना शिवारातील घटना

- येथील एका बिस्कीट कंपनीच्या गोडाऊन मधून बिस्कीट घेऊन जातं असतांना लागली आग

- पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली घटना

- आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमक विभागाला देण्यात आली माहिती

- हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमक दलाने घटनास्थळी येत आगीवार मिळवले नियंत्रण

- आगीत ट्रकसह बिस्कीटचे नुकसान

- हिंगणघाट येथून वणीला जातं होता बिस्कीट घेऊन ट्रक

- आग कश्यामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट

Pandharpur:  विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

पंढरपूर -

विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

विठ्ठल मंदिरापासून 5 किमी दूर पर्यंत विठोबाची पदस्पर्श दर्शन रांग

विठ्ठल दर्शनासाठी 15 तासांचा कालावधी

पालख्या वाखरीत येताच पंढरपुरात चार ते पाच लाख भाविकांची गर्दी

रविवारी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी संतभार पंढरीत दाखल

एकादशी पूर्वीच विठोबाच्या दर्शन रांगेत मोठी गर्दी

दर्शन रांगेत किमान 60 हजार भाविक

Amravati अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या इमारतीची दुरावस्था

अमरावती-

अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या इमारतीची दुरावस्था

बस स्थानकाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी झाली जीर्ण

केव्हाही पाण्याची टाकी कोसळून होऊ शकते मोठा अपघात

पाण्याच्या टाकीच्या पिल्लरला गेले तळे; एसटी महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच

पाण्याची टाकी व इमारत नवीन बांधण्याची होत आहे मागणी

Nandurbar: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

नंदुरबार -

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने हालचालींना वेग

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर

त्यांच्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर हे देखील जिल्हा दौऱ्यावर

निवडणुकीसंदर्भात नंदुरबार शहरात आयोजित कार्यक्रमाला दोघेही करणार संबोधित

महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या भरोसा सेलचा घेणार आढावा

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठरणार पक्षाची रणनीती

 Pune: अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्यात आत्तापर्यंत 3 लाख 2 हजार 61 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

पुणे -

अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्यात आत्तापर्यंत 3 लाख 2 हजार 61 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित

यापैकी दोन लाख 31 हजार 456 विद्यार्थ्यांनी 'कॅप' अंतर्गत प्रवेश केला असून, 70 हजार 605 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत प्रवेश घेतले आहेत

शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली माहिती

Raigad: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

रायगड -

पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

पोलादपुर हद्दीतील पायटा गाव हद्दीत कोसळली दरड

काही काळ पोलादपुर महाबळेश्वर वाहतुक बंद

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने लागलीच दरड हटवण्याचे काम केले

सतर्कता बाळगत वाहतुक सुरु

पोलादपुर तहसिलदार कपिल घोरपडे यांनी घटना स्थळी जाऊन केले दरडग्रस्त भागाची पहाणी

Mumbai: मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा नगरपंचायतीच्या हद्दीमधील अतिक्रमणे हटवली

मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा नगरपंचायतीच्या हद्दीमधील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.

पोलिस बंदोबस्तात हि अतिक्रमणे हटवण्यात आली. यावेळी दंगल नियंत्रण पथक देखिल तैनात करण्यात आले होते.

काल दिवसभरात १२ अतिक्रमणे हटवण्यात आली. आज देखिल लांजा शहरात हि मोहिम सुरु राहणार आहे.

महामार्गावर असलेल्या अतिक्रमाणामुळे महामार्गाच्या कामात अडथळा येत होता.अतिक्रमण हटवल्याने कामाला आता गती येणार आहे.

Nandurbar: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण 

नंदूरबार जिल्ह्यात खड्यांच्या पूल

महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याला जोडणाऱ्या पुलाची दैनिय अवस्था

तापी नदीवरील प्रकाशा पुलाची अत्यंत दुरावस्था

५०० मीटर पुलावर शेकडो खड्डे ,

जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com