Manoj Jarange Patil : मी ठरवलं तर डायरेक्ट कार्यक्रम करतो; भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच मनोज जरांगेंनी डागली तोफ

Manoj Jarange Patil News : छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर तुफान टीका केली. येवल्यात मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam tv
Published On

नाशिक : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी येवला गाठलं आहे. येवल्यात मनोज जरांगे पाटील यांनी थेट छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली आहे. 'मी ठरवलं तर डायरेक्ट कार्यक्रम करतो, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची अंदरसुलमध्ये सभा झाली. या ठिकाणी त्यांच्याआधी छगन भुजबळ यांचा सभा झाली. भुजबळ यांच्यासभेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी एकवटले. या सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं ठरलं, कचाकच पाडा; जरांगे पाटलांकडून मराठा समाजाचा संभ्रम दूर, पाहा स्पेशल रिपोर्ट

मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'येवला तालुक्यात सांत्वनपर भेट आहे. आता रस्त्यात गाव आहे. ते बाजूला सारू का? कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही. मात्र, मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा. आता कोणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष? एकदा जर लोकांनी ठरवलं, येवला पवित्र करायचं तर काही अडचण आहे का? माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नाही. तुम्हाला ज्याला पाडायचं, त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. पण मराठा आरक्षण डोळ्यासमोर ठेवा'.

Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

'मी ठरवलं तर डायरेक्ट कार्यक्रम करतो. आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. तो जुना सारखा सारखा बिघडतो. मी नवा माईक हातात घेतला, यातून लोकांच्या न्यायाचा आवाज येतो, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांना लक्ष्य केलं.

नरेंद्र मोदींवर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'मराठ्यांची गरजच नाही, असं म्हणण्यापेक्षा छोट्या छोट्या उद्योगपतींची देखील गरज नाही. मोठेच उद्योगपती लागतात. त्यांचा संदेश बरोबर आहे. कारण सरकार पाडायला आता गरीब एक झाले आहेत. मत वाया जाऊ देऊ नका. ज्याला पाडायचे, त्याला पाडा हे मी सांगितलं आहे. मी कोणाचं नाव घेतलं नाही. आमचं विधानसभेला समीकरण कुणाशी जुळलं नाही हे दोन्ही सारखेच आहे'.

Manoj Jarange Patil
Eknath Shinde : मी डॉक्टर नसलो तरी,मोठं ऑपरेशन केलंय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

'प्रचाराला कुणीही येईल म्हणून आपल्या सोबत आहे, असं नाही. काही व्यासपीठावर पडून देखील रपारप पाडतील. लोक तिकडे दिसले तरी शेवटी जात खूप महत्त्वाची आहे. शेवटी मतदान करताना त्याच्या समोर त्याची लेकरं आलीच पाहिजेत. कोणी बरोबर असल्याने काही मते पडत नाही. त्यांच्या बरोबर असून देखील कार्यक्रम होतो, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com