Manoj Jarange Patil Explusive Interview on What Maharashtra Government Promises About Maratha Reservation Saamtv
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात, सरकारच्या मसुद्यात नेमकं काय म्हटलंय? वाचा जरांगे पाटलांची EXCLUSIVE मुलाखत

Gangappa Pujari

माधव सावरगावे, प्रतिनिधी|ता. २६ जानेवारी २०२४

Manoj Jarange Patil Exclusive Interview:

मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) लढाई अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट संकेत आता मिळत आहेत. लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलेले मराठा वादळ सध्या वाशीमध्ये आहे. आज मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

मात्र सरकारी अध्यादेश हातात दिल्याशिवाय माघारी फिरणार नाही, उद्या अध्यादेश द्या अन्यथा आझाद मैदानावर धडकणार, असा इशारा देत जरांगेंनी वाशीमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या वाशिमधील सभेनंतर जरांगे पाटील यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी सरकारच्या मसूद्याचे विश्लेषण केले.

आत्तापर्यंत काय काय पदरात पडलं?

अंतरवाली सराटी ते मुंबईचा प्रवास केल्यानंतर मराठा बांधवांच्या काय काय पदरातं पडलं? असा सवाल जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांना विचारण्यात आला, यावर बोलताना त्यांनी ५४ लाख नोदींबाबतची मागणी केलेली त्यावर ३९ लाख नोंदींचे प्रमाणपत्र वाटप केल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांच्या परिवारालाही प्रमाणपत्र दिलं जाईल, त्यासाठी अर्ज करावा लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्या ग्रामपंचायतीत लावण्याच्या सुचना केल्या होत्या, त्यासाठी सरकारने अर्ज नोंदणीचे एक विशेष शिबीरच सुरू केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच एकाची नोंद मिळाल्यास त्याच्या प्रमाणपत्रावर त्याच्या सगेसोयऱ्यांनाही ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली होती, त्याचा अध्यादेश सरकारने काढला नाही. मराठा आंदोलन प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावेत, अशीही मागणी होती, ती मान्य करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील दिशा काय असेल?

"आंदोलन करुन कोणालाही वेठीस धरायचे नाही. सरकारने उद्यापर्यंत अध्यादेश द्यावा. अध्यादेश हातात येईपर्यंत आंदोलन यशस्वी झालं म्हणणार नाही. आता दगाफटका झाल्यास सगळा महाराष्ट्र मुंबईत बोलावणार, आत्ता फक्त २ कोटीच आलेत मात्र नंतर पुर्ण समाज येईल, असे म्हणत विजयी सभा कुठे होईल, याची घोषणा उद्या केली जाईल," असे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT