Leopard Attack : बोरिवलीत बिबट्याची दहशत! पाणी भरायला गेलेल्या पिता पुत्रावर हल्ला; दोघे गंभीर जखमी

Borivali Leopard Attack News : मुंबईतील बोरिवली परिसरात बिबट्याने पिता-पुत्रावर हल्ला केला असून दोघेही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Borivali Leopard Attack News
Borivali Leopard Attack NewsSaam Tv
Published On
Summary
  • बोरिवलीत बिबट्याचा हल्ला

  • पिता-पुत्र गंभीर जखमी

  • संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात भीतीचे वातावरण

  • वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन

संजय गडदे, मुंबई

Mumbai Borivali Sanjay Gandhi National Park Leopard Attack गाव खेड्यात बिबट्याच्या हल्ल्यांच्या अनेक घडामोडी समोर येत असताना आता मुंबईतील बोरिवलीमध्ये एका पिता पुत्रावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. सदर घटना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या कुरार गाव परिसरात घडली आहे. जखमींना उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे नंतर त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १४ मार्च रोजी चंदू खरपडे नावाचे गृहस्थ सकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास पाणी भरण्यासाठी बाहेर आले होते. त्याचवेळी त्यांच्या घरातील एक महिला पुढे गेली असता तिला झुडपात बसलेला बिबट्या दिसला. तिने आरडाओरडा केला. चंदू खरपडे पुढे गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

Borivali Leopard Attack News
Viral Video : चपलेने मारलं, फावड्याने हल्ला केला; तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला चोपलं,Video व्हायरल

चंदू यांच्या आवाजाने त्यांचा २४ वर्षीय मुलगा उमेश त्यांना वाचवण्यासाठी घटनास्थळी धावला. वडिलांना वाचवायला गेलेल्या उमेशवर देखील बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.

Borivali Leopard Attack News
KDMC Politics : ठाकरे सेनेचा धक्कादायक निर्णय! नवनिर्वाचित नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी

जखमींना उपचारासाठी कांदिवली येथील महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या घटनेनंतर पुन्हा एकदा संजय गांधी नॅशनल पार्क परिसरालगत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com