Wardha News: बुलढाणा बस अपघात: मृताच्या नातेवाईकाचा भर आंदोलनात आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी घेतले ताब्यात

Buldhana Bus Accident: आंदोलनाची अद्याप कोणीही दखल घेतली नसल्याने आज आंदोलक परिवारातील चंद्रशेखर मडावी याने आंदोलन मंडपातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने परिसरात एकच गोंधळ उडाला.
Wardha Latest News
Wardha Latest NewsSaamtv
Published On

चेतन व्यास, वर्धा|ता. २६ जानेवारी २०२४

Wardha News:

समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी खासगी बसचा अपघात होऊन भीषण आग लागली होती. या दुर्दैवी घटनेत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना अद्याप कोणतीही मदत देण्यात आली नाही. या विरोधात वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतांच्या नातेवाईकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने एका आंदोलकाने थेट गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या परिवाराच्या सदस्यांनी वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मागील 51 दिवसांपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. साखळी उपोषणाच्या माध्यमातून कुटुंबियांनी घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करा, विदर्भ ट्रॅव्हल्स एजन्सीचा परवाना रद्द करा व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या 25 लाखांच्या मदतीच्या घोषनेची पूर्तता करा या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे.

आंदोलनाची अद्याप कोणीही दखल घेतली नसल्याने आज आंदोलक परिवारातील चंद्रशेखर मडावी याने आंदोलन मंडपातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी समजावीण्याचा प्रयत्न करत आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Wardha Latest News
Jalana News: जालना पोलिसांच्या ताफ्यात नवीन ४४ वाहने दाखल; पालकमंत्री अतुल सावेंनी दाखवला हिरवा झेंडा

दरम्यान, आंदोलनादरम्यान जिल्हा प्रशासनसह राज्य सरकार आंदोलकांची दखल घेत नसल्याचा आरोप केला जातं आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा दौऱ्यावर असतांना एसआयटी स्थापन करण्यासंदर्भात लवकर निर्णय होणार असल्याच सांगितलं होत मात्र त्यावरही अद्यापही निर्णय झाला नसल्याने आंदोलक संतप्त झाले आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha Latest News
Manoj jarange Patil: अध्यादेश दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगेंकडून सरकारला पुन्हा अल्टिमेटम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com