Nagpur News: बुलढाणा बस अपघात: ६ महिने उलटूनही शासकीय मदत नाहीच, मृतांचे नातेवाईक फडणवीसांच्या घरासमोर करणार रामनामाचा जप?

Samruddhi Highway Bus Accident: अपघातनंतर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. मात्र सहा महिने झाले तरी पीडित कुटुंबियांना मदत मिळालीच नाही, तसेच दोषींवरही कारवाई झाली नाही.
Buldhana Bus Accident
Buldhana Bus AccidentSaam tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर|ता. १९ जानेवारी २०२४

Buldhana Bus Accident:

समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी खासगी बसचा अपघात होऊन भीषण आग लागली होती. या दुर्दैवी घटनेत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या भयंकर घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. या अपघातानंतर शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांच्या मदतीची घोषणा केली होती. मात्र सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कोणतीही मदत देण्यात आली नाही, त्यामुळे नातेवाईकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) बुलढाण्याजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता. समृद्धी महामार्गावरील आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा अपघात आहे. या अपघातनंतर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. मात्र सहा महिने झाले तरी पीडित कुटुंबियांना मदत मिळालीच नाही, तसेच दोषींवरही कारवाई झाली नाही.

त्यामुळेच 20 पीडित कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालय समोर राम नाम जप करणार असल्याचा इशारा दिला आहे. आज (१९, जानेवारी) हे परिवार रामनामाचा जप करणार होते, मात्र यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana Bus Accident
PM Modi in Solapur : उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे... PM मोंदीच्या उपस्थितीत मंचावरील एका भाषणाने सर्वांच्या भुवया उंचावल्या, पाहा VIDEO

पोलीस प्रशासनाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर राम नाम जपाचा आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.त्यामुळे संविधान चौक येथे दुपारी 12 ते 4 या वेळेत समृद्धी महामार्गावरील अपघाती मरण पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी मागणी केली जाणार आहे. दरम्यान, मृतकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. पण कुटुंबीयांकडून 25 लाख रुपयांची मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)

Buldhana Bus Accident
PM Narendra Modi : १३ महिने ७ दौरे; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढत्या महाराष्ट्र दौऱ्यांचा अर्थ काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com