Maharashtra Politics: भाजपनंतर अजित पवारांची राष्ट्रवादीच दुसऱ्या नंबरचा पक्ष; भुजबळांनी थेट शिंदे गटाला डिवचलं

Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी मुंबईत महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या मेळाव्याला उपस्थित होते.
Maharashtra Politics|Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadanvis
Maharashtra Politics|Ajit Pawar Eknath Shinde Devendra FadanvisSaam Tv
Published On

रुपाली बडवे, मुंबई|ता. १८ जानेवारी २०२४

Mumbai News:

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मुंबईत महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला राज्यभरातुन आलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी थेट शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला.

काय म्हणाले छगन भुजबळ?

"सगळ्यांनी गोड बोला आणि आपला राष्ट्रवादीचा झेंडा अधिक कसा फडकेल ते बघा. आज हा भव्य मेळावा पाहून पक्ष मोठा कोणाचा हे आज सिद्ध झालंय. पण निवडणुकीत कोण किती आमदार खासदार निवडून आले तर त्यावरुन मोठा पक्ष कोण आहे ते कळेल, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. तसेच भाजपानंतर २ नंबरचा पक्ष अजित पवार राष्ट्रवादीचा आहे," असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी शिंदे गटाला (Shivsena Shinde Group) लगावला.

"अजित दादांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय घेतले जातात. एसटीचे तिकीट अर्ध्यावर केले आणि तोट्यातली एसटी नफ्यात आली. आता महिला आणि पुरुष दोघांच्याही नावावर घर आहे, तसेच पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला लोकसभेत देखील रिझर्वेहश मिळणार आहे.." असेही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यावेळी म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics|Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadanvis
Beed News : दुष्काळामुळे अगोदरच पाणी टंचाई; आता २०९ पाणी नमुने दूषित, बीड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

अजित पवारांकडून लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आवाहन

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही उपस्थित महिलांना संबोधित करताना आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सुचना केल्या "लोकसभा जवळ आलीये, वेळ कमी आहे. फेब्रुवारी झाली की आचारसंहिता लागेल, राज्यात महायुतीनचे मेळावे होतील, त्याला देखील तुम्ही हजेरी लावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. (Latest Marathi News)

Maharashtra Politics|Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadanvis
Maratha Reservation : कोणताही तोडगा निघालेला नाही, सरकार दिशाभूल करतंय; मनोज जरांगे आंदोलनावर ठाम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com