बीड : यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळामुळे अगोदरच पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या बीड (Beed) जिल्ह्यात तब्बल २०९ पाणीनमुने दुषित आढळून आले आहेत. त्यामूळे दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे. आता नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. (Maharashtra News)
बीड जिल्ह्यातील नागरिक विहीर, बोअर अथवा हातपंपाचे पाणी पित असतात. या पाण्याचे स्त्रोत दुषित आहेत का? याची वर्षातून दोनदा तपासणी होत असते. नागरिकांच्या आरोग्याला पाण्यापासून धोका होऊ नये. यासाठी भुजल विभाग प्रयत्नशील असतो. मान्सुनपुर्व आणि मान्सूननंतर अशी तपासणी केली जात असते. डिसेंबर अखेर २०९ ठिकाणचे पाणी नमुने दुषित असल्याचा अहवाल स्वच्छ भारत मिशन विभागाकडे (Water Crisis) आलेला आहे. जिल्हा प्रयोग शाळेच्या माध्यमातून १ हजार १८६ पाणी नमुने तपासण्यात आलेले आहेत. यातील २०९ पाणी नमुने हे पिण्यासाठी आयोग्य आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गटार, कारखान्याचे दूषित पाणी ओढ्यात जिल्ह्यातील विविध भागात गटाराचे, कारखान्यांचे पाणी ओढ्यांना सोडले जाते. परिणामी, त्या भागातील स्त्रोत दुषित होत असतात. ज्या भागात कारखाने आहेत, अशा भागात पिण्याचे पाणी दुषित झालेले आहे. विहीर, बोअरवेल आणि हातपंपाला पाणी असताना ते आता पिण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. तसेच दूषित पाणी पिऊ नका, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.