अभिजित देशमुख
कल्याण : कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत उड्डान पुलाचे काम सुरू आहे. यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. (Kalyan) यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून रिक्षा थांबे देखील बंद केले आहेत. यामुळे रिक्षा चालक संतप्त झाले असून वाहतूक पोलिसांना घेराव घालत यास विरोध दर्शविला आहे. (Tajya Batmya)
कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Railway Station) परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याने येथे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे. काही रस्ते नो एन्ट्री तर काही रस्ते वन वे केले आहेत. यामुळे स्टेशन परिसरातील अनधिकृत रिक्षा स्टँड बंद करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे रिक्षा चालक संतप्त झाले असून आम्ही व्यवसाय करायचा कसा? असा सवाल उपस्थित केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांना घातला घेराव
रिक्षा चालकांनी आज स्टेशन परिसरात आंदोलन करत पोलिसांना घेराव घालत जाब विचारला. रिक्षा चालकांच्या या आंदोलनामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी रिक्षा चालकांनाही आपल्या भावना व्यक्त करताना स्मार्ट सिटीच्या नावाने अत्याचार केला जात आहे.
कामात काही अडथळा नसताना तीन स्टॅन्ड बंद केले. यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून व्यवसाय करण्यासाठी कुठे उभे राहायचे. जागा नव्हती तर इतके परमिट का दिले? पैसे घ्यायचे होते म्हणून परमिट दिले का? असा संतप्त सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित केला. तर पोलिसांनी रिक्षा चालकांना आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.