पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवडाभरात पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १९ जानेवारी सोलापूरमध्ये उभारण्यात आलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करणार आहेत. यामध्ये 30 हजार घरांचा समावेश आहे.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मागच्याच आठवड्यात पंतप्रधान मोदी मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी देशातील सर्वात लांब पुल 'अटल सेतू'चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. (Latest Marathi News)
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे विकासकामांसाठी की आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 80 लोकसभेच्या जागा आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा 48 जागा आहेत.
भाजपने राज्यात 45 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भाजपला 45 हून अधिक जागा जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त जागा जिंकणे सोपे जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्यातील अनेक विकासकामांचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. पंतप्रधान मोदी राज्यातील विविध भागात या निमित्ताने आल्याने मोठा प्रभाव पडत असतो. भाजपने ही बाबत चांगली हेरली आहे. त्यामुळे मागील वर्षभरात पंतप्रधान मोदींनी सात वेळा महाराष्ट्राचा दौरा केला आहे.
डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान मोदींनी नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते. वंदे भारत एक्सप्रेसचंही लोकार्पण केलं होतं. नागपूर मेट्रोचा टप्पा-1 देशाला समर्पित केला आणि फेज-2 चा पायाभरणी केली होती.
जानेवारी 2023 मध्ये पीएम मोदींनी मुंबईत अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली आणि काहींचे उद्घाटन केले. मुंबई मेट्रोनेही प्रवास केला.
फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी मुंबईला शिर्डी आणि सोलापूरला जोडणाऱ्या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. तसेच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचे उद्घाटन केले.
ऑगस्ट 2023 मध्ये, पंतप्रधानांनी पुण्यातील एका कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. पंतप्रधानांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
14 ऑक्टोबर 2023 रोजी, पंतप्रधान मोदींनी मुंबईतील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्रात भाग घेतला.
26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधानांनी अहमदनगरला भेट दिली. तीन दशकांपासून रखडलेल्या निळवंडे धरण कालव्याचं लोकार्पण करण्यात आले. त्याच दिवशी शिर्डी मंदिरात जाऊन भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या आलिशान एसी वेटिंग रूमचे उद्घाटन केले.
12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदींनी नवी मुंबईत 'अटल सेतू'चे उद्घाटन केले.
पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्यांमध्ये 12 हून अधिक लोकसभेच्या जागांना भेटी दिल्या आहेत. नागपूर, पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, नाशिक, सोलापूर व्यतिरिक्त पंतप्रधानांनी मुंबईतील लोकसभेच्या सहा जागाही कव्हर केल्या आहेत. नवी मुंबई दौऱ्यामुळे ठाणे आणि रायगडमध्येही परिणाम होण्याची भाजपला आशा आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.