Yeola : अखेरच्या क्षणी सर्व पक्षीय नेत्यांची एकजूट, येवला तालूका खरेदी-विक्री संघ पदाधिकारी निवडी बिनविराेध

आता आगामी काळातील निवडणूकीत नेमके कोण कोणा सोबत राहणार याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
yeola taluka sahakari kharedi vikri sangh chairman election
yeola taluka sahakari kharedi vikri sangh chairman electionsaam tv
Published On

- अजय सोनवणे

Nashik News :

नाशिक जिल्ह्यातील येवला तालूका खरेदी-विक्री संघाच्या (yeola taluka sahakari kharedi vikri sangh) चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज (गुरुवारी) बिनविराेध झाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत सर्व पक्षातील नेते गट-तट विसरुन एकत्र आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. या बिनविराेधी निवडणुकीची समाज माध्यमातून नाशिक जिल्ह्यात जाेरदार चर्चा सुरु आहे. (Maharashtra News)

येवला तालूक्यातील शेतक-यांसाठी महत्वाची असलेल्या खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रतिष्ठेची झालेली होती. या संघाच्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, भुजबळ समर्थक गट, ठाकरे गट यांच्यात काेण बाजी मारणार अशी चर्चा रंगली हाेती.

yeola taluka sahakari kharedi vikri sangh chairman election
Nashik News : मालेगावात पालकमंत्री दादा भुसेंच्या कार्यालयावर धडकला आशा सेविकांचा मोर्चा

अखरेच्या क्षणी सर्व गट एकत्र आले आणि निवडणुकच बिनविराेध झाली. या संघाच्या चेअरमनपदी संजय सालमुठे आणि व्हाईस चेअरमनपदी परशराम गांगुर्डे यांची निवड करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही निवडणुक बिनविराेध झाल्याने येवला मतदारसंघात नेमके वर्चस्व कुणाचे याची चर्चा रंगू लागली आहे. येवला तालूक्यात एकमेकांची राजकारणात रस्सीखेच करणारे नेते या प्रसंगी एकत्र आल्याने येत्या निवडणूकीत नेमके कोण कोणा सोबत राहणार याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

yeola taluka sahakari kharedi vikri sangh chairman election
Success Story : पारंपरिक शेतीला बगल देत लोहगावचा युवा शेतकरी झाला लखपती, टरबुज लागवडीतून साधली प्रगती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com