Success Story : पारंपरिक शेतीला बगल देत लोहगावचा युवा शेतकरी झाला लखपती, टरबुज लागवडीतून साधली प्रगती

बी.एससी शिक्षण झालेल्या पंडित चिंचोलेंनी शेतीचा मार्ग स्विकारला.
nanded farmer earns lakhs of rupees by growing tarbooj in farm
nanded farmer earns lakhs of rupees by growing tarbooj in farm saam tv

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

पारंपरिक शेती करणे टाळून फळबाग लागवड करुन लाखाे रुपये कमाविता येऊ शकतात असे नांदेड जिल्ह्यातील बिलोली (biloli) तालुक्यातील लोहगाव (Lohagaon Nanded) येथील युवा शेतकरी पंडित चिंचोले यांनी दाखवून दिले आहे. चिंचाेले यांनी टरबूज शेतीतून (tarbooj farming) भरघाेस उत्पन्न मिळविले आहे.(Maharashtra News)

पंडित चिंचोले यांचे बी.एससी पर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी शेतीत लक्ष घातले. त्यांनी पारंपरिक शेती न करता फळबाग शेती करण्याचा निर्णय घेतला. चिंचोले यांची एकूण पाच एकर शेती आहे. या पाच एकर शेतीपैकी दीड एकर शेतीत युवा शेतक-याने टरबुजाची लागवड केली.

nanded farmer earns lakhs of rupees by growing tarbooj in farm
Yavatmal Accident News : पोहरादेवीला निघालेल्या वाहनास बेलगव्हान घाटात अपघात; पाच ठार, 11 जखमी

दीड एकर शेतीत टरबुजाची लागवड करताना त्यांनी योग्य नियोजन केले. बेड पद्धत अवलंबून त्यावर मलचींगचा वापर त्यांनी केला. यासाठी त्यांना सव्वा लाख खर्च आला. हा खर्च वगळता त्यांना तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतर शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आपला आर्थिक स्तर सुधरावा असे आवाहन पंडीत चिंचोले यांनी युवा शेतकऱ्यांना केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

nanded farmer earns lakhs of rupees by growing tarbooj in farm
काेकणातील शेतकरी कुटुंब आनंदले, हापूस आंब्याच्या पानाची Guinness Book of World Record मध्ये नाेंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com