Breaking News: १५ हजार लोकांना मिळणार हक्काची घरं, देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे आज PM मोदींच्या हस्ते लोकार्पण

PM Modi Solapur Visit: सोलापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे.
PM Narendra Modi Solapur Visit
PM Narendra Modi Solapur VisitSaam TV
Published On

PM Narendra Modi Solapur Visit

सोलापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये तब्बल ३० हजार लोकांना हक्काची घरे मिळणार आहेत. त्यापैकी १५ हजार लोकांना आज घरांच्या चाव्या वितरित केल्या जाईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra Modi Solapur Visit
Ram Mandir Ayodhya: राम मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्ला विराजमान; अयोध्येतील पहिला फोटो आला समोर...

कार्यक्रमाला मुख्यमंत्री, शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे बंगळुरुकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, मोदींच्या दौऱ्याआधी सोलापुरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनाद करण्यात आला असून ठिकठिकाणी वाहतुकीचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

सोलापूरमध्ये उभारण्यात आलेला प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प आहे. तब्बल ३६५ एकरमध्ये उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये ८३४ इमारती आहेत. यामध्ये 1 BHK चे ३० हजार फ्लॅट आहेत. ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे.

दरम्यान, या प्रकल्पातील ३० हजारांपैकी १५ हजार घरांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. विशेष म्हणजे या घरांची मालकी महिलांच्या नावाने असणार आहे. प्रकल्पाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी नागरिकांना संबोधित देखील करणार आहे.

मोदींच्या सोलापूर दौऱ्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून सोलापुरात आज राज्याच्या पोलीस महासंचालकांसह ३ हजार पोलीस तैनात असणार आहेत. सभेला येताना मोठ्या बॅग, झेंडे, बॅनर्स, घोषवाक्य फलक, पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थ, विडी सिगरेट, तंबाखूजन्य पदार्थ आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

PM Narendra Modi Solapur Visit
Delhi Pitampura Fire: दिल्लीत अग्नितांडव, ४ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ६ जण होरपळले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com