Delhi Pitampura Fire: दिल्लीत अग्नितांडव, ४ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ६ जण होरपळले

Pitampura Fire News: उत्तर-पश्चिम दिल्लीतील पीतमपुरा भागात ४ मजली इमारतीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
Delhi Pitampura Area Fire News
Delhi Pitampura Area Fire NewsSaam TV
Published On

Delhi Pitampura Area Fire News

उत्तर-पश्चिम दिल्लीतील पीतमपुरा भागात ४ मजली इमारतीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi Pitampura Area Fire News
Nagpur Breaking News: नागपुरात घराला भीषण आग, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू

स्थानिकांकडून आगीची माहिती मिळताच अग्निशन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. बचावपथकाने इमारतीत अडकलेल्या इतर नागरिकांची सुखरुप सुटका करत आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

नेमकी ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम दिल्लीमधील (Delhi) पीतमपुरा परिसरात असलेल्या एका ४ मजली इमारतीला गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने इमारतीचे तीन मजले भक्ष्यस्थानी आले.

आग इतकी भीषण होती, की इमारतीतून धुराचे लोट बाहेर येत होते. आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी बाहेर धाव घेतली. मात्र, एका मजल्यावर राहणारे कुटुंबीय आगीच्या भक्ष्यस्थानी आले. आगीचा भडका उडाल्याने त्यांना वेळेवर बाहेर पडता आलं नाही. स्थानिकांनी या आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ७ बंब घटनास्थळी दाखल झाले. बचावपथकाने इमारतीत अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका केली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी ६ जणांना मृत घोषित केलं. सध्या इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com