Jalana News: जालना पोलिसांच्या ताफ्यात नवीन ४४ वाहने दाखल; पालकमंत्री अतुल सावेंनी दाखवला हिरवा झेंडा

Jalana Latest News: जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस प्रशासनासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी 4 कोटी 11 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीच्या माध्यमातून 29 चारचाकी आणि 16 दुचाकींची पोलिस प्रशासनाकडून खरेदी करण्यात आली.
Jalana Latest News
Jalana Latest NewsSaamtv
Published On

Jalana Breaking News:

आज (शुक्रवार, २६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत जालना जिल्हा पोलिसांच्या ताफ्यात नवीन ४४ वाहने दाखल झाली आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेले 29 चारचाकी आणि 16 दुचाकींचे पालकमंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

जालना पोलीस (Jalana) प्रशासनातील अनेक वाहने खराब झाली आहेत. त्यामुळे पोलिसांना नवीन वाहनांची गरज होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस प्रशासनासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी 4 कोटी 11 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीच्या माध्यमातून 29 चारचाकी आणि 16 दुचाकींची पोलिस प्रशासनाकडून खरेदी करण्यात आली.

या वाहनांचा लोकार्पण सोहळा जालना येथील पोलिस कवायत मैदानावर पार पडला. पालकमंत्री अतुल सावे (Atul Save), आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना आदी उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalana Latest News
Nashik- Mumbai Highway Accident: कसारा घाटात ब्रेक फेल होऊन ट्रक- बसचा भीषण अपघात; ३ जखमी; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला!

दरम्यान, ज्या पोलीस ठाण्यांच्या वाहनांची रनिंग तीन लाख किलोमीटर झाली आहे, अशा पोलीस ठाण्यांना ही नवी वाहने दिली जाणार आहेत. तर शहरातील गल्लीबोळांमध्ये गस्त करण्यासाठी दुचाकींचा वापर केला जाणार आहे. पोलीस प्रशासनात नवीन वाहने आल्याने नियमित रात्रीची गस्तसह इतर कामांची गती वाढणार असल्याने गुन्हेगारीला आळा घालण्यास मोठी मदत या माध्यमातून होणार आहे. (Latest Marathi News)

Jalana Latest News
Maratha Protest Mumbai: CSMT समोर मराठा आंदोलकांकडून चक्काजाम; आझाद मैदानाकडे जाणारा मार्ग रोखला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com