Maratha Protest Mumbai: CSMT समोर मराठा आंदोलकांकडून चक्काजाम; आझाद मैदानाकडे जाणारा मार्ग रोखला

Maratha Protest Mumbai News: एकीकडे मनोज जरांगे यांची आणि सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मराठा आंदोलकांनी सीएसएमटीसमोर चक्काजाम केल्याची माहिती आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation Saam TV
Published On

Maratha Protest Mumbai

आरक्षणाच्या मागणीवर मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील ठाम असून मराठा आंदोलक मुंबईत जोमाने प्रवेश करत आहेत. एकीकडे मनोज जरांगे यांची आणि सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मराठा आंदोलकांनी सीएसएमटीसमोर चक्काजाम केल्याची माहिती आहे. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या मराठा आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडलं असून या मार्गावरची वाहतूक रोखून धरली आहे.

सीएसटीएम परिसरात मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमल्यामुळे परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. दरम्यान वाशीमध्येही मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे आंदोलक जमा झाले आहेत. त्याचबरोबर मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या मराठा समाजातील तरुणांची ठाणे वाशी लोकलमध्ये मोठी गर्दी झाली आहे. सीएसटीएम परिसरात मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमल्यामुळे परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. दरम्यान वाशीमध्येही मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे आंदोलक जमा झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याचबरोबर मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या मराठा समाजातील तरुणांची ठाणे वाशी लोकलमध्ये मोठी गर्दी झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. लाखो मराठा बांधवांसह राजधानी मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईतील आझाद मैदानात जाण्यावर ठाम होते. मात्र त्याआधी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत.

Maratha Reservation
Pandharpur Vitthal Mandir: विठुरायाला 82 तोळ्यांची सोन्याची घोंगडी अर्पण, खास पोशाख परिधान करण्याची आहे परंपरा

"आपल्याला काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची आहे. सरकारने काही कागदपत्रे दिली आहेत, ते वाचून दाखवणार आहे. झालेल्या घटना तुम्हाला सांगायच्या आहेत. आता आपण मोकळं माघारी जाणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्वांना आवाज गेला पाहिजे, गैरसमज नको म्हणत साऊंड सिस्टिमची व्यवस्था झाल्यानंतर २ वाजता याबाबत जाहीर सभेत घोषणा करणार असल्याचेही जरांगेंनी सांगितले आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून सर्व मागण्या मान्य?; मनोज जरांगे २ वाजता मोठी घोषणा करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com