Pandharpur Vitthal Mandir: विठुरायाला 82 तोळ्यांची सोन्याची घोंगडी अर्पण, खास पोशाख परिधान करण्याची आहे परंपरा

Pandharpur Vitthal Mandir News: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या खजिन्यामध्ये सोन्याच्या दागदागिन्यांची भर पडू लागली आहे. आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एका भाविकाने जवळपास 51 लाख रुपये किंमतीचे 82 तोळे वजनाच्या सोन्याची घोंगडी गुप्तदान म्हणून देवाला अर्पण केली आहे.
Pandharpur Vitthal Mandir
Pandharpur Vitthal MandirSaam Digital
Published On

Pandharpur Vitthal Mandir

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या खजिन्यामध्ये सोन्याच्या दागदागिन्यांची भर पडू लागली आहे. आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एका भाविकाने जवळपास 51 लाख रुपये किंमतीचे 82 तोळे वजनाच्या सोन्याची घोंगडी गुप्तदान म्हणून देवाला अर्पण केली आहे.

विठ्ठलाला शेतकऱ्यांचे दैवत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे विठुरायाला पगडी घोंगडी असा खास पोशाख परिधान केला जातो त्याच भावनेपोटी या भाविकांनी सोन्याची घोंगडी देवाला अर्पण केली आहे. नवीन‌ वर्षाच्या सुरुवातीलाच देवाच्या चरणी सोन्याची घोंगडी अर्पण करण्यात आली आहे.

विठ्ठलाची महती जगभर पसरली आहे. विविध देश विदेशातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला येत असतात. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच देणग्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. आज 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एका विठ्ठल भक्ताने जवळपास 82 तोळे वजनाची सोन्याची घोंगडी देवाला गुप्तदान म्हणून अर्पण केली आहे. आज मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते देवाला सोन्याची घोंगडी परिधान करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur Vitthal Mandir
Nana Patole: प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर आहेत; जागावाटपावरून नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

चांदवड रेणुका देवीच्या गाभाऱ्यात तिरंगा ध्वजाची फुलांची आरास

नाशिकच्या प्रसिद्ध चांदवड येथील राजराजेश्वरी रेणुका देवीच्या गाभाऱ्यात आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत केशरी, सफेद रंगांची फुले व हिरव्या रंगाचा पाला यांच्या साहाय्याने गाभारा तिरंगी ध्वजाने सजवण्यात आला. शिवाय त्यावर निळ्या रंगात अशोकचक्र साकारण्यात आले,आज शुक्रवार आणि सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांची दर्शनाला गर्दी झाली होती, देवीचा गाभारा तिरंगी रंगात सजल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला.

Pandharpur Vitthal Mandir
Dhananjay Munde: सरकारसमोर एकच आव्हान, मराठा आरक्षणावर धनंजय मुंडेंचे मोठे विधान; म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com