सरकारसमोर मराठा आरक्षणावरून आव्हान आहे. ते म्हणजे मराठा समाजाला दिलं जाणारं आरक्षण हे कायम आणि पिढ्यानपिढ्या टिकलं पाहिजे. त्यामुळे थोडासा वेळ लागतोय, मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे, ती म्हणजे दिलं जाणारं आरक्षण हे कायम टिकावं.. असं म्हणत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकार समोर निर्माण झालेल्या पेचावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणालेत धनंजय मुंडे?
"1999 पासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) चळवळीत काम करणारा मी एक गैर मराठा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी कायम मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी रस्त्यावर आणि जिथं मिळन तिथं मी रस्त्यावर उतरलो आहे. 2002 साली मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो, त्यावेळेस पहिला ठराव मी मराठा आरक्षणाचा घेतला होता," असे धनंजय मुंडे म्हणाले.
तसेच "मराठा आरक्षणाविषयी आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, फक्त एवढेच आहे की जे आरक्षण दिलं जाणार आहे, ते आरक्षण कायम पिढ्यानपिढ्या टीकलं पाहिजे. आरक्षण देण्याच्या बाबतीत दुमत कुणाच्या मनात नाही. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी भलेही थोडासा वेळ लागत असेल तरी आरक्षण कायम टिकले गेले पाहिजे, ते आरक्षण दिल जाणार आहे, " असा विश्वासही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केला.
टिकणारं आरक्षण दिलं गेलं पाहिजे...
"एका चुकीमुळे आरक्षण टिकण्याला अडचण येईल, अशी कोणतीही चूक होऊ न देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि हे जरांगे पाटलांना (Manoj jarange Patil) देखील माहित आहे. त्यामुळे सरकारकडून हजार पटीने काम सुरू आहे. आमची भूमिका एवढीच आहे की मराठा समाजाला पिढ्यानपिढ्या टिकणारं आरक्षण दिलं गेलं पाहिजे.." असेही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.