Maratha Aaraksha: मराठा आरक्षण सर्वेक्षण करणाऱ्या पथकासमोर नवं चॅलेंज; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

Maratha Reservation: प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रगणकांना काही काळ बसवून ठेवण्यात आले तर प्रभाग एकमध्ये प्रगणकांना तुम्ही कोण आहात?, असे प्रश्नही विचारण्याता आल्याची माहिती समोर आलीये.
Maratha Aaraksha
Maratha AarakshaSaam TV
Published On

रामू ढाकणे

Chhatrapati Sambhaji Nagar:

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागात विरोध पत्करावा लागल्याची बाब समोर आलीय. प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रगणकांना काही काळ बसवून ठेवण्यात आले तर प्रभाग एकमध्ये प्रगणकांना तुम्ही कोण आहात?, असे प्रश्नही विचारण्याता आल्याची माहिती समोर आलीये.

Maratha Aaraksha
Maratha Andolan: मनोज जरांगेंच्या आंदोलनावर आजच निघणार तोडगा? सरकारचे प्रतिनिधी लोणावळ्यात; नेमकं काय घडतंय?

इतकेच नाही तर सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना तुम्ही कोणाच्या परवानगीने इथे सर्वेक्षण करत आहात? असे प्रश्न उपस्थित करत या कर्मचाऱ्यांना हुसकावून लावल्याची खळबळजनक घटना देखील छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलीये.

दरम्यान, तिसऱ्या दिवशी प्रशासनाने ४० हजार घरांचा आकडा पार केला असून ३१ जानेवारीपर्यंत पावणे दोन लाख कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचं उद्दिष्ट छत्रपती संभाजीनगर महापालिकेन समोर ठेवलंय. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सर्वर डाऊन असल्याने अनेक अडचणी आल्या परंतु तिसऱ्या दिवशी कामकाज सुरळीत चालू झाले असले तरी काही भागात कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या विरोधाला सामोर जाव लागलंय.

शिक्षकांना सर्वेक्षण ड्यूट्या, शाळांना टाळे

मराठा आरक्षणच्या सर्व्हेचं काम स्थानिक सरकारी कार्यालयावर सोपविण्यात आलं आहे. यामध्ये शिक्षकांचा देखील समावेश आहे. कल्याण डोंबिवलित देखील महापालिका कर्मचाऱ्यांसह केडीएमसीच्या शिक्षकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आल्याने नाईलाजास्तव शाळा बंद करून शिक्षक सर्व्हे करत आहेत.

पालिकेच्या सर्वाधिक 1800 पटसंख्या असलेल्या कल्याण जवळील बल्याणी येथील बंदे अली खां शाळेतील 21 पैकी 18 शिक्षकांना सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलं आहे. यामुळे शाळेत फक्त पहिलीचा वर्ग भरवला जात असून बाकी दुसरीपासून सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन दिवसांपासून सुट्टी देण्यात आले आहे.

परीक्षा काही महिन्यांवर आलेली असताना शिक्षक सर्वेक्षणासाठी गेल्याने शाळा बंद ठेवली जाणार असेल तर अभ्यासक्रम पूर्ण होणार केव्हा असा प्रश्न नाराज पालकांनी उपस्थित केला आहे.

Maratha Aaraksha
VIDEO: ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबला, सुसाट कारने दोघांना उडवलं; संभाजीनगरमधील थरारक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com