Maratha Andolan: मनोज जरांगेंच्या आंदोलनावर आजच निघणार तोडगा? सरकारचे प्रतिनिधी लोणावळ्यात; नेमकं काय घडतंय?

Mumbai Maratha Morcha News: भगवं वादळ मुंबईत येऊन धडकण्यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने जरांगे यांची मनधरणी सुरू आहे. यासाठी सरकारचे प्रतिनिधी लोणावळ्यात दाखल झाले आहे.
Maratha Andolan Mumbai Latest Marathi News
Maratha Andolan Mumbai Latest Marathi NewsSaam TV
Published On

Manoj Jarange Maratha Morcha Latest News

मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधव आज मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपणार आहे. संध्याकाळी लोणावळा येथून मराठा आरक्षण पदयात्रेचा नवी मुंबईत प्रवेश होण्याची शक्यता आहे. भगवं वादळ मुंबईत येऊन धडकण्यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने जरांगे यांची मनधरणी सुरू आहे. यासाठी सरकारचे प्रतिनिधी लोणावळ्यात दाखल झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Andolan Mumbai Latest Marathi News
Breaking News: शरद पवारांच्या कट्टर समर्थकांसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल; साडेचारशे कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) मुंबईत आले, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे जरांगे यांनी सरकारला आणखी काही दिवसांचा अवधी देऊन आंदोलन स्थगित करावं, यासाठी प्रयत्न सुरू आहे. आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले आहे.

यामध्ये मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, जरांगे यांच्या भेटीपूर्वी मधुकर अर्दड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्यांच्या अनुषंगाने शासन काम करीत असून काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत, त्यासंदर्भात आम्ही जरांगे यांच्या भेटीसाठी आल्याचं अर्दड यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची समाधानकारक चर्चा होईल. त्यानंतर ते नक्कीच आपलं आंदोलन मागे घेतील, असा विश्वासही विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगे नेमका काय निर्णय घेणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून सुरू झालेली मराठा आरक्षण पदयात्रा आज मुंबईच्या वेशीवर येऊन धडकणार आहे. लोणावळा येथून मोठ्या संख्येने मराठा बांधव नवी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून पोलिसांनी शहरात अवजड वाहनांना बंदी घातली आहे.

Maratha Andolan Mumbai Latest Marathi News
Ram Ramdir News: राम मंदिराच्या तिजोरीत पैशांची अतिवृष्टी; पहिल्याच दिवशी कोट्यवधींचं दान, नेमके किती पैसे जमले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com