Ayodhya Ram Ramdir Latest News
Ayodhya Ram Ramdir Latest News Saam TV

Ram Ramdir News: राम मंदिराच्या तिजोरीत पैशांची अतिवृष्टी; पहिल्याच दिवशी कोट्यवधींचं दान, नेमके किती पैसे जमले?

Ayodhya Ram Temple: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत भाविकांचा महासागर उसळला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जवळपास अडीच लाखांहून अधिक भाविकांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलंय.

Ayodhya Ram Ramdir Latest News

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत भाविकांचा महासागर उसळला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जवळपास अडीच लाखांहून अधिक भाविकांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलंय. त्याचबरोबर रामाच्या चरणी भरभरून दान देखील दिलं आहे. त्यामुळे मंदिराच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची देणगी जमा झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ayodhya Ram Ramdir Latest News
Weather Forcost: थंडी कमी होऊन तापमान वाढणार, ११ राज्यांमध्ये कोसळणार पाऊस; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट

प्राप्त माहितीनुसार, पहिल्या दोन दिवसांतच राम मंदिराच्या (Ram Mandir) तिजोरीत तब्बल ३.१७ कोटी रुपये जमा झाले आहेत. भाविकांनी दान पेटीत तसेच ऑनलाइन देणगी दिली आहे. यासाठी भाविकांना मोठी कसरत देखील करावी लागली. प्रचंड गर्दी असूनही भाविकांनी संयम दाखवत तासनतास रांगेत उभे राहून दान अर्पण केले.

अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारण्यात यावं, अशी रामभक्तांची इच्छा होती. यासाठी त्यांना अनेक दशके वाट पाहावी लागली. मात्र, सोमवारी (२२ जानेवारी) रामभक्तांची इच्छा पूर्ण झाली. अयोध्येत रामललाचं भव्य मंदिर उभारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. (Latest Marathi News)

यानिमित्ताने देशभरात दिवाळी साजरी झाली. गावागावात, शहरा-शहरात आणि महानगरातही उत्साह आणि आनंदात अयोध्येतील सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यात आला.देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या रामभक्तीचा मेळा शरयूतीरी जमला होता.

दरम्यान, राम मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आल्यानंतर अयोध्येत मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी भाविकांचा महासागर उसळला होता. अजूनही अनेक भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल होत अजून यानिमित्ताने तिजोरीत मोठी भर पडण्याची शक्यता आहे.

Ayodhya Ram Ramdir Latest News
Sambhajinagar News: कर्तव्य बजावून घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com