Prakash Ambedkar On Jarange: मनोज जरांगेंच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं, प्रकाश आंबेडकरांचा दावा

Prakash Ambedkar On Jarange: जरांगे पाटील यांनी लक्षात घेतलं पाहीजे की कितीही लोक घेऊन गेला तरी सत्तेतील लोकांना आरक्षण द्यायच नाही. तसंच मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं. त्यामुळे त्यांनी पंगतीत जेवण करावं, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना दिला आहे.
Prakash Ambedkar On Jarange
Prakash Ambedkar On JarangeSaam Digital
Published On

Prakash Ambedkar On Jarange

मराठा आरक्षणावर सरकारने प्रामाणिक राहिलं पाहिजे. एवढ्या लवकर तोडगा काढणं शक्य नाही. त्याला वेळ लागणार, डेटा गोळा करताना प्रचंड चुका आहेत. जरांगे पाटील यांनी लक्षात घेतलं पाहीजे की कितीही लोक घेऊन गेला तरी सत्तेतील लोकांना आरक्षण द्यायच नाही. तसंच मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं. त्यामुळे त्यांनी पंगतीत जेवण करावं, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना दिला आहे.

कायद्याच्या दृष्टीने जी शेवटची खिडकी आहे ती बंद करू नका. सरकारची मानसिकता नाही आरक्षण देण्याची. गेली अनेक आंदोलने निजामी मराठयांनी जिरवली आहेत. ओबीसींचे ताट वेगळे आणि गरीब मराठ्यांचे ताट वेगळे ठेवावे, मागणी करणारे अख्य जग मागू शकतात. दरम्यान त्यांनी आझाद मैदानावर मराठा समाजाचे आंदोलक बसले तरी काही बिघडणार नाही त्यामुळे पोलीस आणि मराठा आंदोलकांमधील संघर्ष टाळण्याचं आवाहन केलं.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prakash Ambedkar On Jarange
Lok Sabha Election 2024: अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार गटाला लोकसभेसाठी उमेदवार सापडला? अजित पवार शिरूरच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात भित्रा माणूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात भित्रा माणूस आहे. मोदींनी आपण पंतप्रधान म्हणून नाही तर सामान्य माणूस म्हणू पूजा केल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एक दिवसासाठी गुजरलीलाला नंदा शोधायला हवा होता. नात्र नायक सिनेमातील अनिल कपूर सारखी आपली अवस्था होते की काय अशी आपली अवस्था अशी भीती मोदींना होती.

Prakash Ambedkar On Jarange
Onion Price : तर येत्या निवडणुकीत 'नोटा'वर शिक्का; कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com