Onion Price : तर येत्या निवडणुकीत 'नोटा'वर शिक्का; कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांचा इशारा

Solapur News : मागच्या काही महिन्यांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियोजन कोलमडल्याने कांदा लिलावाला आठवड्यातून तीन ते चार वेळा सुट्ट्या द्याव्या लागत आहेत.
Onion Price
Onion PriceSaam tv
Published On

सोलापूर : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावल्याने शेतकऱ्यांचे दिवसेंदिवस हाल होत आहेत. तसेच यंदा कांद्याचे (Solapur) उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने कांद्याचे भाव कोलमडत आहेत. यामुळे कांदा (Onion) उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये 'नोटा'वर शिक्का मारणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी सत्ताधारी व विरोधकांना दिला आहे. (Live Marathi News)

Onion Price
Jalgaon Accident : जेवणासाठी घरी आला अन् काळाची झडप; दुभाजकाला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा महाराष्ट्रातली कांद्याला योग्य भाव देणारी (Bajar Samiti) बाजार समिती म्हणून त्याचा नावलौकिक आहे. मात्र मागच्या काही महिन्यांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियोजन कोलमडल्याने कांदा लिलावाला आठवड्यातून तीन ते चार वेळा सुट्ट्या द्याव्या लागत आहेत. त्याच सामान्य शेतकरी (Farmer) भरडला जातोय. त्यामुळे आता शेतकऱ्याने थेट नोटावर शिक्का मारण्याचा मनसुबा तयार केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Onion Price
Crop Insurance : ५० टक्के पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विम्याची भरपाई

७०० ते १२०० रुपयेच मिळतोय भाव 

मागच्या काही वर्षांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्याला योग्य भाव देणारी बाजार समिती म्हणून नावालौकिकास आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील शेतकऱ्यांचा ओढा हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वळल्याचं दिसून आलं. कांद्याचे होणारे वेळेत लिलाव आणि त्याच बरोबर शेतकऱ्याला हव्या असलेल्या वेळेत मिळणारी योग्य रक्कम यामुळे शेतकरी राजा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वळला गेला होता. मात्र मागच्या काही महिन्यांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियोजन पुरता ढासळले. पाच ते आठ हजार प्रतिक्विंटल कांद्याला मिळणारा भाव आता ७०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन ठेपला आहे. 

Onion Price
Latur News : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपविले जीवन; लातूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

तर रस्त्यावर फिरू देणार नाही 

शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रियेचे राजकीय वर्तुळात ही मोठ्या प्रमाणामध्ये पडसाद उटताना पाहायला मिळत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी हा सध्या मरणाच्या दारावर उभा आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजाचा आक्रोश लवकरात लवकर समजून घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी. अन्यथा येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधीक राजकीय नेत्यांना शेतकरी राजा रस्त्यावर फिरू देणार नाही; असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com