Crop Insurance : ५० टक्के पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विम्याची भरपाई

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी स्थिती असून राज्य सरकारने जिल्ह्यातील ३७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या मंडळांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे.
Nandurbar Crop Insurance
Nandurbar Crop InsuranceSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात यंदा उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भरपाई दिली जात आहे. यात आतापर्यंत (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील ५० टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच लाभ देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी सांगितले. (Maharashtra News)

Nandurbar Crop Insurance
Cotton Price : घरात साठवलेला कापूस स्वस्तात विक्री; वैतागलेल्या कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी स्थिती असून राज्य सरकारने जिल्ह्यातील ३७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या मंडळांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा (Crop Insurance) लाभ मिळणार आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी (Farmer) आणि पाणीपुरवठा योजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्य सरकार संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा शब्द यावेळेस पाटील यांनी दिला.

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar Crop Insurance
Jayakwadi Dam : जायकवाडीतून दुसऱ्या आवर्तनाला विलंब; रब्बीसह उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा

आतापर्यंत जिल्ह्यातील ५० टक्के पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्यांना अजूनही विम्याचा लाभ मिळालेला नाही. परंतु दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना येत्या काळात दुष्काळी परिस्थितीमध्ये राहिलेला पिक विमाही लवकरच मिळणार आहे. त्यासाठी सरकारच्या वतीने योग्य ती पावलं उचलली जात असून दुष्काळी परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com