Cotton Price : घरात साठवलेला कापूस स्वस्तात विक्री; वैतागलेल्या कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत

Hingoli News : गतवर्षी कापसाला १० हजार प्रतिक्विंटलपर्यंत दर पोहचला होता. मात्र आणखी दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला होता.
Cotton Price
Cotton PriceSaam tv
Published On

हिंगोली : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाला मागील अनेक महिन्यांपासून सहा हजार पाचशे रुपयांपेक्षा अधिक भाव मिळालेला नाही. अखेर वैतागलेल्या हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरात साठवलेला शेकडो क्विंटल कापूस (Cotton) बाजारपेठेत विक्रीला काढला आहे.  (Live Marathi News)

Cotton Price
Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त 1,132 जवानांना शौर्य पदके, महाराष्ट्राला किती?

गतवर्षी कापसाला १० हजार प्रतिक्विंटलपर्यंत दर पोहचला होता. मात्र आणखी दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी (Farmer) कापूस घरात भरून ठेवला होता. मात्र नंतर भाव वाढ झाली नसल्याने नाईलाजास्तव कानी दरात कापसाची विक्री करावी लागली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हीच परिस्थिती यंदा देखील (Cotton Price) पाहण्यास मिळत असून भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी यंदा सुरवातीला कापूस विक्री न करता घरात भरून ठेवला आहे. मात्र यंदा ६ हजार ५०० च्यावर दर न गेल्याने आता नाईलाजास्तव कापूस विक्री करावा लागत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cotton Price
Nandurbar Congress : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मोर्चे बांधणी; नंदुरबार जिल्ह्यात इच्छुकांची मोठी गर्दी

तर कापूस उत्पादन घेणे बंद 

लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अनास्थेमुळे हिंगोली तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने स्वस्त दरात खाजगी व्यापाऱ्यांना शेतकरी कापूस विक्री करत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान भविष्यात हिंगोलीमध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यास कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे उत्पादन घेणे बंद करण्याची शक्यता शेतकरी कांता पवार यांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com