सागर निकवाडे
नंदुरबार : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या नंदुरबार जिल्ह्यात उमेदवारांची चाचणी केली जात आहे. या (Nandurbar) मतदार संघात नऊ जणांनी दावा सांगितला असला, तरी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला विजयी करण्यासाठी सर्वच (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र असून पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वजण मेहनत करणार आहे. (Latest Marathi News)
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला आहे. मात्र २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा या मतदार संघात पराभव झाला. त्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून गेला आणि आतापर्यंत या ठिकाणी (BJP) भाजपच्या हातात आहे. या मतदार संघात २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांनी कडवी झुंज दिली होती. २०१९ च्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे या मतदार संघात भाजप उमेदवारांचा मताधिक्य कमी करण्यात काँग्रेसला यश आले होते. त्यानंतर आता होऊ घातलेल्या २०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात?
त्यासोबत या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारांची मोठी गर्दी असल्याने पक्षाकडून उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहनेही महत्वाचे आहे. मात्र मागच्या वेळेस भाजप उमेदवारांचे मताधिक्य कमी करणारे उमेदवार के. सी. पाडवी यांना पुन्हा उमेदवारीची संधी मिळू शकते अशी शक्यता आहे. तर काँग्रेस पक्षाच्या वतीने वन बूथ ५० युथ ही संकल्पना राबविण्यात आली असून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांसोबत चर्चा करून उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल; अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.