Turmeric Crop : हिंगोलीत शेतकऱ्यांची उभी हळद करपली; दोन दशकानंतरचे पहिल्यांदाच भीषण चित्र

HIngoli News : देशपातळीवर सर्वात जास्त हळद पिकवणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या वर्षी हळदीचे उत्पादन घटणार आहे.
Turmeric Crop
Turmeric CropSaam tv
Published On

हिंगोली : हळदीचे उत्पादन घेण्यासाठी लागवड केली. चांगले पोषण होण्यासाठी खत व फवारणी केली. (Hingoli) मात्र हळदीचे पीक चांगले वाढण्याच्या बहरात असताना करपा रोगाचा प्रादुर्भाव पडला. यामुळे (Turmeric) हळदीचे उभे पीक करपून गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. (Latest marathi News)

Turmeric Crop
Budget 2024: अर्थसंकल्पानंतर शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार? 'ही' मोठी घोषणा होण्याची शक्यता

देशपातळीवर सर्वात जास्त हळद पिकवणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या वर्षी हळदीचे उत्पादन घटणार आहे. हळदीच्या लागवडीनंतर पीक वाढण्याच्या उमेदीत असताना अचानक हळदीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन शेतातील उभी हळद जळाली आहे. वेळोवेळी (Farmer) महागड्या औषध फवारण्या करून देखील उपयोग न झाल्याने हळद काढणीच्या वेळी उत्पादन हे घटणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Turmeric Crop
Prakash Ambedkar: ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षण वादावर मी मध्यस्थी करण्यास तयार; प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य

दोन दशकानंतर प्रथमच विदारक चित्र 

मागील दोन दशकात एवढी भीषण परिस्थिती आलेली नाही. असे परिसरातील शेतकरी सांगत आहेत. यामुळे सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com