प्रजासत्ताक दिन 2024 (Republic Day 2024) निमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा यांच्या एकूण 1,132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. राज्यातील अठरा कर्मचाऱ्यांना ही पदके देण्यात येणार आहेत.
277 शौर्य पदकांपैकी 275 जम्मू-काश्मीर पोलिसांचे 72 जवान, महाराष्ट्रातील 18 जवान, छत्तीसगडमधील 26 जवान, झारखंडमधील 23 जवान, ओडिशाचे 15 जवान, दिल्लीतील 8 जवान, सीआरपीएफच्या 65 जवानांना, 21 जवानांना शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहेत. इतर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील SSB आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उर्वरित कर्मचाऱ्यांना इतर पदके देण्यात आली आहेत.
राष्ट्रपती पदक/शौर्य पदक
दोन श्रेणींमध्ये 277 शौर्य पदके जाहीर करण्यात आली आहेत. ज्यात 275 शौर्य पदके आणि दोन राष्ट्रपती पदके (Republic Day Gallantry Medals) आहेत. या 277 पैकी तब्बल 133 जवानांना जम्मू आणि काश्मीरमधील शौर्यासाठी, 119 जवानांना LWE आणि उर्वरित 25 कर्मचाऱ्यांना इतर प्रदेशातील कारवाईसाठी पुरस्कृत केले जात आहे. दोन सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांसाठी (Republic Day 2024) आहेत.
विशिष्ट सेवेसाठी पदक
विशिष्ट सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या पदकांमध्ये 102 कर्मचारी आणि नंतर अंतर्गत 753 कर्मचार्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. 102 पदकांपैकी 94 पोलीस खाते, तर प्रत्येकी चार अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षणासाठी ((Republic Day 2024) आहेत. 753 पदकांपैकी, 667 पदके पोलीस कर्मचार्यांसाठी आहेत, तर अग्निशमन सेवेसाठी 32 आहे. नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा या दोघांना प्रत्येकी 27 पदके मिळाली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.