Jayakwadi Dam : जायकवाडीतून दुसऱ्या आवर्तनाला विलंब; रब्बीसह उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा

Parbhani News : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून दरवर्षी दोन वेळेस आवर्तन सोडण्यात येत असते. या पाण्याच्या आवर्तनामुळे शेतकरी रब्बीच्या पिकांसह उन्हाळी पीक लागवडीचे नियोजन करून पेरणी करत असतात.
Jayakwadi Dam
Jayakwadi DamSaam tv
Published On

परभणी : पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी दोन पाणी (Parbhani) आवर्तनाचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येते. यंदा मात्र अद्याप दुसरे आवर्तन सोडण्याच्या कोणत्याच हालचाली नसल्याने शेतकऱ्यांना (Farmer) पाण्याची प्रतीक्षा लागली आहे. (Tajya Batmya)

Jayakwadi Dam
Nandurbar Congress : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मोर्चे बांधणी; नंदुरबार जिल्ह्यात इच्छुकांची मोठी गर्दी

जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam) डाव्या कालव्यातून दरवर्षी दोन वेळेस आवर्तन सोडण्यात येत असते. या पाण्याच्या आवर्तनामुळे शेतकरी रब्बीच्या पिकांसह (Rabi Crop) उन्हाळी पीक लागवडीचे नियोजन करून पेरणी करत असतात. यंदा पहिले आवर्तन नोव्हेंबर २०२३ मध्ये सोडण्यात आले. मात्र अद्यापही दुसऱ्या पाणी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले नसल्याने रब्बी हंगामातील पिकांना फटका बसू लागला असून उन्हाळी हंगामातील उसालाही पाण्याची आवश्यकता भासणार आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jayakwadi Dam
Cotton Price : घरात साठवलेला कापूस स्वस्तात विक्री; वैतागलेल्या कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत

जायकवाडीत पाणीसाठा कमी 

रब्बी हंगामातील पिकांना पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची मंजुरी आवश्यक असते. मात्र अद्यापही कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्यामुळे पाणी कधी सुटणार हा प्रश्न आहे. जायकवाडी धरणात पाणी कमी असल्याने अरबीचे दूसरे आवर्तन सुटते की नाही, याबाबत शेतकन्यांमध्ये चिता व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यामुळे पिकांना दुसरे आवर्तन कधी सोडणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com