Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam Digital

Lok Sabha Election 2024: अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार गटाला लोकसभेसाठी उमेदवार सापडला? अजित पवार शिरूरच्या दौऱ्यावर

Lok Sabha Election 2024: देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तयार तयार होत आहे. राज्यातही त्याचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक जण लोकसभेच्या तयारीला लागलेला आहे. पुण्यातही शरद पवार गट विरूद्ध अजित पवार गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
Published on

Lok Sabha Election 2024

देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तयार तयार होत आहे. राज्यातही त्याचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक जण लोकसभेच्या तयारीला लागलेला आहे. पुण्यातही शरद पवार गट विरूद्ध अजित पवार गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंना पडणार म्हणजे पडणार असं आवाहन अजित पवारांनी दिल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असून अमोल कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार मैदानात उतरणार का? याची जोरदार चर्चा रंगली आहे.

अमोल कोल्हेंना आव्हान देण्यासाठी महायुतीकडून अद्याप उमेदवार कोण अशी चर्चा रंगलीय. त्यातच अमोल कोल्हेंना आव्हान देण्यासाठी तरुण चेहरा मैदानात उतरणार आहेत. यासाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार शिरुर लोकसभा मतदारसंघातून लढणार अशी चर्चा रंगतेय. त्यामुळे अजित पवार शिरुर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असून आज जुन्नरमध्ये विविध विकासकामांचा उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर शेतकरी मेळाव्यातून मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हेंना आव्हान कसं देणार, याबाबत काही बोलणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lok Sabha Election 2024
Adani Green Energy Project : जनभावनेचा विजय! पाटगाव धरणाच्या पाण्यावर उभारला जाणार वीज प्रकल्प रद्द : आमदार प्रकाश अबिटकर

फेब्रुवारीत सर्व मंत्रिमंडळाला अयोध्येची वारी

उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील जुन्नर तालुक्यातमध्ये दाखल झाले आहेत. दिवसभर ते विविध कार्यक्रम, भूमिपूजन समारंभ आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान अजित पवार व वळसे पाटील यांनी नारायणगाव येथील 350 वर्षांपूर्वीच्या श्रीराम मंदिरात दर्शन घेतलं. दरम्यानअजित पवार यांनी राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुन्हा कौतुक केलं आहे. फेब्रुवारीमध्ये सर्व मंत्री मंडळाला अयोध्येची वारी घडवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Lok Sabha Election 2024
Onion Price : तर येत्या निवडणुकीत 'नोटा'वर शिक्का; कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com