- रणजीत माजगावकर
जनभावना लक्षात घेता अदानी समूहाने पाटगाव धरणाच्या पाण्यावर (Patgaon Dam) कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे उभारला जाणार जलविद्युत निर्मीती प्रकल्प रद्द करीत असल्याचे पत्र नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना पाठविले आहे. काेल्हापूरवासियांनी उभारलेल्या आंदाेलनामुळे अदानी ग्रुपने हा प्रकल्प रद्द केल्याची माहिती आमदार प्रकाशराव अबिटकर (Mla Prakash Aabitkar) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे अदानी कंपनीच्या माध्यमातून हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्प उभारला जाणार हाेता. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातील पाणी नेण्यात येणार हाेते.
त्यास गावातील नागरिकांनी माेठा विरोध दर्शविला. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वीज निर्मिती प्रकल्पाला नकाे अशी भूमिका घेत गावक-यांनी आंदोलन छेडले हाेते. सुमारे 115 गावांना धरणाच्या पाण्याचा उपयाेग हाेताे. हे पाणी वीज प्रकल्पास दिल्यास शेती आणि पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहील अशी भीती व्यक्त केली गेली.
दरम्यान जनभावना लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करीत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना प्राप्त झाल्याची माहिती आमदार अबिटकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. ते म्हणाले हा जनतेचा विजय आहे. जनतेच्या भावनेला प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही अदानी ग्रुपचे देखील आभार मानताे असे आमदार अबिटकर यांनी नमूद केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.