Mandhardevi Yatra 2024 : मांढरदेव गड... पशुहत्‍या, मद्य विक्री, अवैध वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर

काळूबाईच्या यात्रे निमित्त प्रशासन सज्ज.
Mandhardevi Temple
Mandhardevi Templesaam tv
Published On

Satara News :

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील श्री क्षेत्र मांढरदेव येथील ‍श्री काळेश्‍वरी देवीच्या यात्रेनिमित्त (mandhardevi yatra 2024) प्रशासन सज्ज झाले आहे. येत्या २४ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत मांढरदेव येथील काळूबाईची वार्षिक यात्रे निमित्त भाविकांना जास्त जास्त साेयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. दरम्यान यात्रा काळात पशुहत्‍या, मद्य विक्री करणा-यांवर तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Maharashtra News)

मांढरदेव येथील काळूबाईच्या यात्रेचा यंदा 25 जानेवारीस मुख्य दिवस आहे. ही यात्रा शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी योग्य समन्वय साधावा असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी नुकतेच मांढरदेव यात्रा निमित्त आयाेजिेलेल्या आढावा बैठकीत वाईतील स्थानिक प्रशासनाला दिल्या.

Mandhardevi Temple
Pune : येत्या साेमवारी पुण्यातील मटण, चिकन विक्री दुकाने राहणार बंद

दरम्यान यात्रेनंतर येणाऱ्या पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार, शुक्रवार व रविवारी या दिवशी गडावर मोठी गर्दी होत असते. यावेळी पशुहत्या करण्याचे प्रकार घडतात. त्‍यामुळे आवश्यक त्या पथकांनी महिनाभर गड आणि परिसरात गस्त घालावी अशी सूचना गलांडे यांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गडावर वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी वाहनतळ व इतर बाबींचे नियोजन करावे. राज्यात काेविडचा प्रादुर्भाव वाढू हाेऊ नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. भाविकांनी देखील मास्क, सॅनिटायझर या गाेष्टींचा वापर करावा असे गलांडेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Mandhardevi Temple
Pali Khandoba Yatra 2024: 'पाल'ची खंडेरायाची यात्रा... २० ते २८ जानेवारी वाहतुकीत माेठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com