- नितीन पाटणकर
येत्या साेमवारी (ता. 22) पुणे शहर (pune city), पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) तसेच कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील (chhatrapati shivaji market) मटन आणि चिकन विक्री बंद ठेवण्याचा निर्णय कुरेशी समाजाने घेतला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या (ram mandir ayodhya) सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे कुरेशी समाजाने नमूद केले. (Maharashtra News)
येत्या साेमवारी २२ जानेवारीला प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा उत्साह देशभरात दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील राम मंदिर साेहळ्या निमित्त वेगवेगळ्या जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत.
दरम्यान प्रभु श्रीराम यांना अभिवादन म्हणून कुरेशी समाजाने पु्ण्यात 22 जानेवारीला आपली मटण आणि चिकन विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या दिवशी समाजाच्या वतीने लाडू आणि गाेड प्रसादाचे वाटप देखील करण्यात येणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.